राज्यातील अल्पसंख्याकबहुल क्षेत्रातील १२ शहरामध्ये मुस्लिम, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना सक्षम बनविण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील महिलांचे स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन केले आहेत. अल्पसंख्याक घटकातील महिलांना संघटित करणे, त्यांना पतपुरवठ्याची संधी उपलब्ध करून देणे; तसेच उद्योजकीय विकासाची संधी; तसेच माहिती- ज्ञानाचा स्रोत उपलब्ध करून देणे हा यामागील उद्येश आहे.