Walking 10 Thousand Steps Benefits : सध्या फीट व्हायचं असेल तर दिवसाला अमुक एक पावलं चालायलाच हवीत असा ट्रेंड सध्या जोरात आहे. तसे अॅप्स सध्या फोनमध्ये स्मार्टवॉचमध्येदेखील असतात. आणि आपण आज किती चाललो यावर वॉचही ठेवला जातो.
दिवसाला १० हजार पावले चालण्याची कल्पना यामासा टोकेई या जपानी कंपनीची आहे. या कंपनीने १९६५मध्ये पहिले व्यावसायिक पेडेमीटर बाजारात आणले होते. या यंत्राला मानपो-केई म्हणजेच १०,००० स्टेप्स मीटर या नावाने ओळखले जात. या उपकरणाला लगेच लोकप्रियता मिळाली आणि तेव्हापासून ही संकल्पना रुजू झाली.
जगभरात ही संकल्पना वापरी जात असली तरी, अनेकांच्या मनात याबाबत शंकाकुशंका असते. त्यामुळे यात सांगितल्या प्रमाणे दिवसाला १० हजार पावले चालणे खरंच आरोग्यासाठी चांगले आहे की, नाही याविषयी तज्ज्ञ काय सांगतात जाणून घेऊया.
अभ्यासानुसार
नियमित चालल्याने स्मृतीभ्रंश, कर्करोग, मृत्यूचा धोका कमी होत असल्याचं जामा इंटर्नल मेडिसीन आणि जामा न्यूरोलॉजी जर्नल्समध्ये प्रकाशित अभ्यासात सांगण्यात आलं आहे. तुमच्या शरीराचा पूर्ण भार उचलून हालचाल यात होत असल्याने हृदय, रक्तवाहिन्यांसंबंधी, फुफ्फूसांच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
शिवाय हाडे मजबूत होतीत, संतूलन सुधारते, स्नायुंची ताकद वाढते, सहनशक्ती वाढते. चरबी कमी होऊन निरोगी वजन राखण्यास फायदे होतात.
१० हजार पावले चालण्याने खरंच फायदा होतो?
२०२२ मध्ये झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, ९ हजार ८०० पावले स्मृतीभ्रंश होण्याचा धोका ५० टक्क्यांनी कमी करणे आणि दिवसाला फक्त ३ हजार ८०० पावले उचलणे २५ टक्क्यांनी कमी करणे यासारख्या गोष्टींमुळे आरोग्याला लाभ मिळू शकतात.
यासंदर्भातले मिथक
एवढे पावलं चालल्याने झटपट वजन कमी होतं असं नाही.
विशिष्ट संख्येत अडकण्यापेक्षा चालण्याचे फायदे ओळखून अधिकाधिक चालण्याचा सराव करणे गरजेचे असते.
निरोगी जीवनशैली अंगीकराण्यासाठी चालण्याबरोबर इतर व्यायमप्रकार, संतुलित आहार, चांगल्या सवयी यांचा अवलंब करणे आवश्यक असते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.