Belly Fat: बडीशेपचे पाणी महिलांसाठी फायदेशीर, योग्य वेळी सेवन केल्यास पोटाची चरबी होईल कमी

Belly Fat: दिवसभर बसूण डेस्क जॉब करणे, व्यायाम न करणे आणि आहाराची काळजी न घेणे यामुळे वजन वाढते.
Belly Fat:
Belly Fat: Sakal
Updated on

Belly Fat: पोटाची चरबी वाढणे किंवा पोट वाढणे ही सामान्य समस्या आहे. एका ठाराविक वयानंतर लोकांना पोटाची चरबी कमी करणे अवघड होते. तसेच पोटाची चरबी वाढणे ही समस्या महिलांमध्ये अधिक असते. दिवसभर बसूण डेस्क जॉब करणे, व्यायाम न करणे आणि आहाराची काळजी न घेणे यामुळे वजन वाढते.

कंबरेभोवती चरबी वाढते?

व्यायाम करणाऱ्या आणि जिममध्ये जाऊन व्यायाम करणाऱ्या अनेकांना वजन कमी करण्यात अडचणी येऊ शकतात. कंबरेभोवतीची चरबी कमी करण्यासाठी व्यायामासोबतच आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. तुम्ही बडीशेपचे सेवन करून पोटावरची चरबी आणि वजन कमी करू शकता.

Belly Fat:
Neck Pain Home Remedies: एकसारखे मोबाईलकडे पाहून मान आखडलीय? मग हाताच्या अंगठ्याने करा मसाज, लगेच मिळेल आराम

वजन नियंत्रणात राहते

वजन कमी करण्यासाठी तुम्ही बडीशेपचे पाणी पिऊ शकता. बडीशेपचे पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. यामुळे तुमचे वजन कमी होईल आणि कंबर आणि पोटावर जमा झालेली हचरबीही कमी होईल.

बडीशेपचे पाणी कसे बनवावे

बडीशेपचे पाणी तयार करण्यासाठी एका भांड्यात अर्धा लिटर पाणी उकळण्यासाठी ठेवा. त्यात एक चमचा बडीशेप घाला. बडीशेप आणि पाणी घट्ट होईपर्यंत उकळू द्यावे. नंतर ते गाळून त्यात एका लिंबाचा रस पिळून प्यावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.