Self-Care Tips: मूड खराब आहे, वाईट वाटतंय, तर 'या' 5 गोष्टी नक्की ट्राय करा, पुन्हा व्हाल आनंदी

Self-Care Tips: वाईट वाटणं, निराश वाटणं किंवा मूड खराब होणं ही सामन्य गोष्ट आहे. ती एक भावना आहे, जी जवळपास प्रत्येकजण अनुभवतो. पण काही छोट्या गोष्टी केल्याने आपण त्यातून बाहेर येऊ शकतो.
Happy Mood
Happy MoodSakal
Updated on

Self-Care Tips: आयुष्यात प्रत्येकजण वेगवेगळ्या भावनांचा अनुभव घेत असतो. कधीकधी एखादा दिवस खूप आनंदी असतो, तर कधीतरी मन अगदी निराश होतं. आपला मूड चांगला नसतो, त्यामुळे कामातही बऱ्याचदा मन लागत नाही.

पण, पहिली गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे की वाईट वाटणं, निराश वाटण किंवा मूड खराब होणं ही सामन्य गोष्ट आहे. या गोष्टींचा सामना कोणीही करू शकतं. ती एक भावना आहे, जी जवळपास प्रत्येकजण कधी ना कधी अनुभवत असतो.

त्यामुळे आधी यातून बाहेर पडण्यासाठी आपण कोणत्या गोष्टीमुळे निराश आहोत किंवा आपला मूड खराब झाला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला आपल्या निराशेचे खरं कारण समजतं आणि त्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मदत होते.

दरम्यान अशा काही गोष्टीही आपण करू शकतो, ज्यामुळे आपला खराब मूड पुन्हा चांगला होऊन आपल्या मनाला छान वाटू शकेल. अशाच पाच गोष्टींचा आपण आढावा घेऊ.

Happy Mood
Holi 2024 : मथुरा-वृंदावनमध्ये साजऱ्या होणाऱ्या रंगोत्सवात सहभागी व्हायचंय? मग, फिरायला जाण्याचा करा प्लॅन

गाणी ऐकणे

गाण्यांमध्ये अनेकांचा मूड बदलण्याची ताकद आहे, पण प्रत्येकासाठी हा अनुभव वेगळा असू शकते. म्हणजे प्रत्येकासाठी गाण्यांची आवड वेगवेगळी असू शकते. काहींना पॉप संगीत आवडू शकते, तर काहींना शास्त्रीय संगीत आवडू शकते.

इतकेच नाही, तर काहींना गाणी ऐकून चांगलेच वाटेल असे नाही. त्यामुळे गाणी ऐकल्याने खरंच आपला मूड चांगला होणार आहे का, ही गोष्ट लक्षात घेऊनच गाणी ऐकावी.

आवडत्या व्यक्तींशी बोलणे

बऱ्याचदा आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर बोलण्याने आपल्याला छान वाटू शकते. त्यांच्याशी बोलून आपलं दु:ख दूर होऊ शकते. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ घालवल्यानेही आपल्याला छान वाटू शकते. त्यामुळे शक्य असेल, तर अशावेळी आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर वेळ घालवा किंवा त्यांच्याशी संपर्क साधा.

Happy Mood
Yoga Tips : रोजच्या धावपळीमुळे हातापायांमध्ये वेदना जाणवतात? मग, 'या' योगासनांच्या सरावामुळे मिळेल आराम

आवडणाऱ्या गोष्टी करणे

ज्यावेळी कशातच मन लागत नसेल, तेव्हा ज्या गोष्टी करण्याने आपल्याला छान वाटते अशा गोष्टी करण्याचा फायदा होऊ शकतो.

जसे की एखाद्याला वाचण केल्याने चांगले वाटते किंवा एखादी व्यक्ती भान हरपून पेटिंग करू शकते किंवा एखाद्याला डान्स केल्यानेही छान वाटू शकते, त्यामुळे आपल्या आवडत्या गोष्टी केल्याने आणि आपले छंद अशावेळी जपल्याने चांगले वाटू शकते.

महत्त्वाचे म्हणजे आपण अशावेळी आधी इतरांपेक्षा स्वत:ला महत्त्व देणे महत्त्वाचे असते. कारण जर आपण आनंदी आणि समाधानी असू, तर आपण इतरांना आनंद देऊ शकतो.

रडणे

बऱ्याचदा रडणे आपण कमजोरीचे लक्षण मानतो, पण खरंतर तसे नाही. रडल्याने मनातली निराशा दूर होण्यासाठी मदत होते. बऱ्याचदा रडल्यामुळे आपला मूड बरा होण्यासाठी मदत होते.

ज्यावेळी आपल्याला एखाद्या गोष्टीचे वाईट वाटत असेल आणि रडू येत असेल, तर रडल्याने मन हलके वाटू शकते. पण जर तुम्हाला सारखेच रडू येत असेल, तर मात्र तुम्हाला वैद्यकिय मदत घेण्याची गरज भासू शकते.

Happy Mood
Benefits of Sunbathing : हाडांच्या बळकटीपासून ते वजन कमी करण्यापर्यंत, सकाळच्या उन्हामुळे मिळतात 'हे' आरोग्यदायी फायदे

तुमच्या भावनांबद्दल लिहून काढणे

ज्यावेळी आपल्याला खूप वाईट वाटत असेल, मूड खराब असेल, तेव्हा त्याबद्दल लिहून काढले, तर त्याचा फायदा होऊ शकतो. असं म्हटलं जातं आपल्या भावना लिहून काढल्याने समस्या नेमकी काय आहे, हे आपल्याला कळते आणि त्यामुळे त्यातून मार्ग काढणे सोपे जाते. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावना लिहून काढल्याने तुमचा मूडही चांगला होऊ शकतो.

फिरायला जा

काही जणांना फिरल्याने आनंद मिळतो. अशा लोकांनी जर मूड खराब असेल तर एखादा फेरफटका बाहेर मारल्याने चांगेल वाटू शकते. मनातील निराशेचे मभळ दूर होऊन पुन्हा मनात उर्जा निर्माण होऊ शकते.

आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्या

काहींना खाण्याची आवड असते. त्यामुळे बऱ्याचदा आवडते पदार्थ खाल्यानेही मूड चांगला होऊ शकतो.

माफ करा

बऱ्याचदा एखादी व्यक्ती तुमच्याची चुकीची वागली असेल किंवा मनाला टोचेल असं बोलली असेल, तरी आपल्याला वाईट वाटू शकते. अशावेळी फारवेळ त्याबद्दल विचार करू नये.

राग ठेवू नये. त्यामुळे बऱ्याचदा त्या व्यक्तीपेक्षा आपल्यालाच त्याचा अधिक त्रास होतो. आपल्यात नकारात्मक भावना तयार होतात. त्यामुळे राग, मनस्ताप मनात ठेवण्यापेक्षा त्या व्यक्तीला माफ करून पुढे जाणे चांगले असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.