प्रेम की मैत्री? दोघांमधील अंतर कसं ओळखाल

प्रेम आणि मैत्री याच्यात तुम्हीही कन्फ्युज आहात का?
प्रेम की मैत्री? दोघांमधील अंतर कसं ओळखाल
Updated on

१९९८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'कुछ कुछ होता हैं' हा चित्रपट आठवतोय का? मैत्री आणि प्रेम यांची उत्तमरित्या सांगड घालणाऱ्या या चित्रपटात अभिनेत्री काजोल, राणी मुखर्जी आणि शाहरुख खान या तिघांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. मैत्री आणि प्रेम यांच्यातील अंतर, मैत्री श्रेष्ठ कि प्रेम हे सारं काही या चित्रपटाच्या माध्यमातून अत्यंत सुंदररित्या दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु, प्रेम आणि मैत्री यांच्यातील गुंता केवळ चित्रपटांमध्येच होतो असं नाही. खऱ्या आयुष्यातदेखील अनेकांसोबत हे घडत असेल.किंबहुना अनेक जण आजही मैत्री आणि प्रेम यांच्यातील अंतर समजण्यास त्या फेजमधून जात असतील. म्हणूनच मैत्री आणि प्रेम यांच्यात असलेली पुसटशी रेष कोणती किंवा हे अंतर नेमकं कसं समजून घ्यायचं हे आज जाणून घेऊयात. (flirty-vs-friendly-find-out-difference-between-two)

साधारणपणे जे प्रेमात असतात तेच आपल्या प्रिय व्यक्तीसोबत किंवा त्यांनी जी व्यक्ती आवडते त्यांच्यासोबतच फ्लर्ट केलं जातं असा सर्वसामान्य समज आहे. परंतु, अनेकदा जे मुलगा-मुलगी बेस्ट फ्रेंड असतात ना तेदेखील मस्करीमध्ये एकमेकांसोबत फ्लर्ट करतात. मात्र, अनेकदा आपल्या आजूबाजूचे लोक या फ्लर्टींगचा वेगळ अर्थ काढतात. परिणामी, हे बेस्टफ्रेंड्सदेखील त्यांच्या नात्याविषयी संभ्रमात पडतात.

कसं ओळखाल मैत्री आणि प्रेम यांच्यातील अंतर?

१. प्रेम -

जर एखादी व्यक्ती तुमच्या प्रेमात पडली असेल तर ती थेट तुमच्या डोळ्यात डोळे घालून संवाद करेल आणि तिच्या मनातील भाव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल.

मैत्री -

जर तुमच्यात केवळ मैत्री असेल तर समोरचा व्यक्ती इतर मित्र-मैत्रिणींमध्येही तुम्हाला समान वागणूक देईल. म्हणजे तुम्हाला दरवेळी तो स्पेशल ट्रिटमेंट देईलच असं नाही. परंतु, जर तुम्ही काही बोलत असाल तर त्याचं लक्ष लगेच तुमच्याकडे वेधलं जाईल. यालाच मैत्री किंवा बेस्ट फ्रेंड म्हटलं जातं.

प्रेम की मैत्री? दोघांमधील अंतर कसं ओळखाल
डायबिटीज नियंत्रणात आणायचाय? मग फॉलो करा 'हे' डाएट

२. प्रेम -

अनेक जण प्रेम व्यक्त करतांना फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, हे सगळ्यांनाच जमत असं नाही. काही जण अबोल प्रेम व्यक्त करत असतात. जसं की एखाद्या ठिकाणी तुम्ही दोघंच असाल तर ती व्यक्ती तुम्हाला त्याच्या वागण्याबोलण्यातून प्रेमाचा एक ठराविक संकेत देत असते. सोबतच तुमच्या मनात काय सुरु आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते.

मैत्री-

जर तुमच्यात केवळ मैत्री असेल तर तुम्ही एकांताच्या ठिकाणी जरी दोघंच असाल तरी तुमच्या होणारे संवाद हे सर्वसामान्य मित्रांप्रमाणेच असतात. त्यात कोणताही संकेत नसतो. ती निखळ मैत्री असते आणि यात दोघांमध्ये होणारा संवाददेखील इतर मित्र-मैत्रिणींप्रमाणेच असतो. यावेळी ते एकमेकांसोबत पर्सनल, प्रोफेशनल प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असता किंवा सांगत असता.

प्रेम की मैत्री? दोघांमधील अंतर कसं ओळखाल
Coronavirus : मीठ, साखरेवर ठेवा नियंत्रण; फॉलो करा असा डाएट प्लॅन

३. प्रेम-

एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल तर आपण तिच्या आवडीनिवडी, तिच्या सवयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. ती व्यक्ती आपल्यासमोर कायम खुश राहिल याकडे लक्ष देत असतो.

मैत्री -

सहाजिकच तुमच्यात मैत्री आहे तर तुम्हाला एकमेकांच्या आवडीनिवडी माहित असतील. त्यामुळे तुमचा बेस्ट फ्रेंड तुम्हाला खास तुमच्या आवडीनिवडी किंवा अन्य प्रश्न विचारणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()