फरशी चकचकीत कशी करावी?
अनेकदा बरेचजण घरातील फरशी पिवळी झाल्यामुळे खूपच वैतागतात. या समस्येवर मात करण्यासाठी कोणत्या पद्धती अवलंबवायच्या, हे त्यांना कळत नाही. अशात या काही टिप्सचा तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो हे जाणून घ्या. याच्या मदतीने तुमच्या घरातील फरशी पांढरी (White Floor Tips) तर होऊ शकतेच शिवाय तुमचं घर चकचकीत (How To Clean Floor) बनवू शकतो. अशा परिस्थितीत कोणत्या पद्धती आहेत आणि त्या कशा वापरायच्या हे तुम्हाला माहितेय का. चला ते जाणून घेऊयात.
फरशी चकचकीत कशी करावी
घराची फरशी चकचकीत करायची असेल, तर अशा वेळी पाण्याच्या बादलीत लिंबाचा रस मिसळून तयार केलेल्या मिश्रणाने स्वच्छ करावा. असे केल्याने फरशी चकचकीत तर करता येतेच पण पिवळसरपणा दूर करता येतो.
फरशी चकचकीत करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा देखील वापरू शकता. अशा वेळी तुम्ही पाण्याच्या मगमध्ये बेकिंग सोडा पावडर मिक्स करून त्यात सुती कापड भिजवून स्वच्छ करा. त्याचबरोबर चट्टेही काढता येतात.
तसेच फरशी स्वच्छ आणि क्लिन करायची असेल तर अशा वेळी पाण्याच्या मगमध्ये रॉकेल मिसळून सुती कापड भिजवून त्याचे डाग स्वच्छ करा. ते स्वच्छ केल्यानंतर फरशी गरम पाण्याने धुऊन घ्या. असे केल्याने फरशी स्वच्छ होऊ शकते.
या गोष्टींची विशेष काळजी घ्या...
- फरशी अ ॅसिडने साफ करू नका अन्यथा फरशी खराब होऊ शकते.
- जेव्हा जेव्हा फरशी स्वच्छ कराल तेव्हा रबरी हातमोजे घाला.
- जाड कापडाने पुसून घ्या. हलके कपडे लवकर खराब होऊ शकतात आणि स्वच्छही निघणार नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.