कडाक्याचे ऊन असले तरी मुलांच्या शाळांना सुट्टी असते म्हणून अनेक ट्रिप प्लॅन केले जातात. उन्हाळ्याच्या दिवसात मामाच्या गावाला जाऊन कंटाळा येत असेल. तर नवे काहीतरी लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्हीही यंदाच्या सुट्टीत काहीतरी वेगळं शोधत असाल तर उटी (Ooty) बेस्ट आहे.
उटीला तुम्ही याआधीही जाऊन आला असाल. तर , यंदाच्या उन्हाळ्यात काहीतरी स्पेशल आहे. कारण, उटीतील प्रसिद्ध फ्लॉवर फेस्टीव्हल यंदाच्या उन्हाळ्यात होणार आहे. या फेस्टला देशभरातील पर्यटक भेट देतात. तसेच, अनेक विदेशी पर्यटकही इथे हजेरी लावतात. (Tourism News)
1896 पासून होतोय फ्लॉवर फेस्टीव्हल
उटीचा फ्लॉवर फेस्टिव्हल आजपासून नाही तर 1896 सालापासून साजरा केला जातो. दरवर्षी 250 हून अधिक लोक या महोत्सवात 150 हून अधिक प्रजातींच्या फुलांच्या प्रदर्शनासाठी येतात. फ्लॉवर शो पाहण्यासाठी दरवर्षी लाखो लोक येतात.
यावर्षी देखील बोटॅनिकल गार्डनमध्ये उटी फ्लॉवर फेस्टिव्हल 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाचे आयोजन केलेल्या बागेच्या अगदी मध्यभागी, विविध प्रजातींच्या फुलांच्या सुमारे 1500 कुंड्या सजवल्या जातात. (Flower Festival)
या फुलांनी आकर्षित होऊन येथे दरवर्षी पर्यटक येतात. उत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते ज्यात संगीत आणि नृत्याचा समावेश होतो.
किती दिवस असतो हा फेस्टीव्हल
मिळालेल्या माहितीनुसार, 'उटी फ्लॉवर फेस्टिव्हल 2024' 6 दिवस चालणार आहे. 17 मे रोजी सुरू होईल आणि 22 मे रोजी संपेल. येथे सजवलेली फुले पाहण्यासोबतच त्यांची सविस्तर माहितीही पर्यटकांना मिळणार आहे.
फोटोग्राफी प्रेमींसाठी हा फ्लॉवर फेस्ट विशेषत: सुवर्ण संधी आहे. कारण, या आश्चर्यचकीत करणाऱ्या फुलांचे फोटो काढण्यासाठी लाखो लोक इथे भेट देतात.
फ्लॉवर फेस्टिव्हल पाहण्यासाठी
फ्लॉवर फेस्टीव्हल ला भेट देण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकींग करता येईल. या तिकीट काउंटरवरून ऑफलाइनही तिकीट खरेदी करता येणार आहे. फ्लॉवर फेस्टिव्हलसाठी मोठ्यांसाठी तिकीटाची किंमत 50 आहे.
तर, लहान मुलांसाठी तिकीट 30 आहे. तिकीट खरेदी करून, प्रेक्षक दिवसभर महोत्सवाचा आनंद घेऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.