अनेक तरूण मुलामुलींना आता लग्नासाठी स्थळ शोधायची असतील तर अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यात मॅट्रिमोनिअल साइट्स (matrimonial Site)आघाडीवर आहेत. अनेक मुलं आता मॅट्रिमोनिअल साइटवर वर स्वत: रजिस्टर करतात आणि लग्नासाठी (Marriage) स्थळं शोधतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून मॅट्रिमोनिअल साइट्सवरही फसवणुकीच्या (Fraud) घटना वाढत आहेत. अशा परिस्थितीत कोणती व्यक्ती कशी आहे, ते ओळखणे अवघड जाते. कारण काही जण समोरच्या व्यक्तीचे खोटे फ्रोफाईल तयार करून किंवा आपली माहिती समोरच्या व्यक्तीपासून लपवून त्याला फसविण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय काही लोकं पैशांची मागणीही करतात. अशावेळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मॅट्रिमोनिअल साइटवर स्थळ शोधताना समोरच्या व्यक्तीचे प्रोफाईल योग्य कि अयोग्य ते शोधणे गरजेचे आहे. त्यासाठी या काही टिप्स फॉलो करा. (How To find Truth Profile On matrimonial site)
फोटोमुळेच कळते सत्य, असे ओळखा
असं म्हणतात, फोटोच माणसाचे खरे रूप सांगतात. कोणत्याही साइटवर प्रोफाइल तयार करण्यापूर्वी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करावा लागतो. योग्य मॅट्रिमोनिअल आयडीसाी फ्रोफाइल फोटो खूप महत्वाचा असतो. अशावेळी तुम्ही फोटो नसलेल्या कोणत्याही फ्रोफाईल्सना शॉर्टलिस्ट करू नका. तसंच तुम्ही फोटो पाहून त्या व्यक्तीच्या वयाचा योग्य अंदाज लावू शकता. पण, जर एखाद्याने फोटो जास्तच एडिट केला असेल तर त्या फ्रोफाईलपासून चार हात लांब राहा. तुम्ही फ्रोफाईलचे नाव फेसबुकवर टाकून तिथेही ही व्यक्ती नेमकी कशी दिसते, त्याची माहिती याची शहानिशा करू शकता. (How To find Truth Profile On matrimonial site)
मुलभूत माहितीवरून सत्य शोधा
कोणत्याही मॅट्रिमोनिअल साइटवर आयडी तयार करण्यासाठी तुम्हाला काही मुलभूत माहिती द्यावी लागते. पण, अशी कोणतीही माहिती तुम्हाला एखाद्याच्या फ्रोफाईलवर दिसली नाही तर अशा लोकांपासून अंतर ठेवा याशिवाय ही माहिती कोणी दिली असेल तर ती तपासून पाहा. जर तुम्हाला शंका असेल तर अधिक काळजी घ्या. (How To find Truth Profile On matrimonial site)
सारखे फोटो एडिट करण्यांऱ्यापासून सावधान
काही लोक साइटवर सतत आपले फ्रोफाइल संपादित करत असतात. सतत फोटो बदलणे, जात बदलणे असे चालू असते. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे कारण अशा प्रकारची लोकं खोटी असण्याची शक्यता जास्त असते. (How To find Truth Profile On matrimonial site)
पैसे मागणाऱ्यांपासून सावध राहा
जर तुम्हाला साइटवरच्या कोणीही प्रोफाईलद्वारे पैसे मागितले तर सावधान. कारण अनेकांनी मॅट्रिमोनियल वेबसाईटद्वारे अनेकांना ऑनलाइन फसवले आहे, त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने मॅट्रिमोनियल साइटद्वारे तुमच्याकडे पैसे मागितले तर त्याच्यापासून लांब राहमे अधिक चागंले. (How To find Truth Profile On matrimonial site)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.