White Shoes Cleaning Tips: पांढऱ्या शूजची चमक कायम ठेवायची असेल तर फॉलो करा 'या' टिप्स

आजकाल पांढरे शूज घालण्याची खूप क्रेझ आहे.
White Shoes
White Shoes sakal
Updated on

थोडा वेळ पाऊस पडणे चांगले वाटते कारण जास्त पाऊस आपल्यासाठी आपत्ती ठरतो. पाऊस पडल्यानंतर रस्त्यावर पाणी तुंबते आणि चिखलाचा प्रश्नही निर्माण होतो. कपडे नीट सुकत नाहीत आणि बाहेर फिरताही येत नाहीत. पण काय करणार, ऑफिससाठी तर बाहेर जावं लागतं.

ऑफिसला जाण्यासाठी फक्त छान कपडे घालावे लागतात असे नाही तर चपलांचीही काळजी घ्यावी लागते. आजकाल पांढरे शूज घालण्याची खूप क्रेझ आहे, कारण ते आपला लूक सुंदर बनवतात. पण पांढरे शूज पावसात खूप खराब होतात.

White Shoes
Black Hair Tips: खोबरेल तेलात टाकून लावा या 2 गोष्टी, पांढरे केस काही दिवसातच होतील काळे!

शूजवरील घाण सहज साफ होत असली तरी तेलाचे डाग इत्यादी डाग साफ करणे थोडे कठीण जाते. म्हणूनच बरेच लोक डाग असलेले शूज फेकून देतात, परंतु आता तुम्हाला तसे करण्याची गरज नाही. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही बुटावरील तेलाचे डाग किंवा इतर कोणत्याही प्रकारचे डाग सहज साफ करू शकता.

चार्ट पेपरचा वापर

पांढरा शूज स्वच्छ करण्यासाठी चार्ट पेपर उपयुक्त ठरू शकतो. चार्ट पेपर केवळ शूजमधील चिखल साफ करणार नाही तर कोरडी माती काढण्याचे काम करेल. चला तर मग जाणून घेऊया, त्याचा वापर कसा करता येईल.

शूजवर माती असल्यास ते कापडाच्या साहाय्याने हलक्या हातांनी स्वच्छ करा. नंतर चार्ट पेपर फोल्ड करून बुटावर ठेवा. मग बुटावरचा चिखल कागदावर येईल आणि चिखल निघून जाईल. शूजमधून चिखल साफ होईपर्यंत हे करा.

White Shoes
Ceiling fan cleaning tips: 5 मिनिटात स्मार्ट पद्धतीनं पंखा स्वच्छ करा, या ट्रिक्स वापरून पाहा

थिनरचा वापर करा

माती स्वच्छ करण्यासाठी थिनरचाही वापर करता येतो. ते वापरण्यापूर्वी, आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की थिनर मुळे शूजचे कोणतेही नुकसान होत नाही. चिखलाचे डाग काढून टाकण्यासाठी, कपड्यावर थिनर टाकून शूज स्वच्छ करा.

बेकिंग सोडा वापरा

शूजवरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा देखील वापरू शकता. कारण बेकिंग सोडामध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात, जे कोणत्याही प्रकारचे डाग सहज साफ करू शकतात. बेकिंग सोडा थेट डाग असलेल्या भागावर टाका आणि ब्रशच्या मदतीने हलके चोळा.नंतर काही वेळ असेच राहू द्या आणि कोमट पाण्याने धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.