Foods For Period Cramps : त्या 'चार' दिवसातील दुखण्यावर गुणकारी ठरतेय चॉकलेट!

चॉकलेट खाणे सर्वांनाच आवडते. तरूणींसाठी तर ते एखाद्या टॉनिक सारखेच काम करते
Foods For Period Cramps
Foods For Period CrampsEsakal
Updated on

सर्वच महिलांना मासिक पाळी दरम्यान दर महिन्याला भयानक वेदनांचा सामना करावा लागतो. पीरियड क्रॅम्प्स, अती रक्तस्त्राव यांसारख्या अनेक समस्यांही त्या वेदनांसोबत होत असतात. पाळीच्या त्या चार दिवसात होणाऱ्या वेदनांमध्ये आराम मिळण्यासाठी चॉकलेट गुणकारी असल्याचा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

चॉकलेट खाणे सर्वांनाच आवडते. तरूणींसाठी तर ते एखाद्या टॉनिक सारखेच काम करते. पीरियडमध्ये होणाऱ्या वेदना खूप त्रासदायक असतात. ज्यापासून आराम मिळण्यासाठी अनेक कडू औषधे घ्यावी लागतात. त्यामूळे इच्छा नसतानाही पेन किलर्स खाव्या लागतात. अशावेळी चॉकलेट तूमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत आहे.

पीरियड्सच्या दुखण्यापासून कायमचा आराम मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. पीरियड्स डाएटमध्ये काही खाद्यपदार्थांचा समावेश केल्याने तूमचे स्नायू बळकट होतील. त्याने तूमच्या दुखण्यावर कायमचा उपाय ठरू शकतो. पाळीच्या काळात होणाऱ्या आजारापासून सुटका करण्यासाठी चॉकलेटसह कोणते पदार्थ खायचे ते पाहुयात.

Foods For Period Cramps
Christmas Celebration : बर्फवृष्टीशिवाय ख्रिसमसला मजा नाही; या ठिकाणीच साजरा करायला हवा ख्रिसमस !

चॉकलेट

चॉकलेट खायला कोणाला आवडत नाही. चॉकलेटच्या गोडव्याशिवाय ते मॅग्नेशियमचा एक चांगला स्त्रोत मानले जाते. ज्यामुळे स्नायूंना आराम मिळतो. चॉकलेट शरीरातील डोपामाइनच्या पातळीला प्रोत्साहीत करते. ज्यामुळे तुमचा मूड चांगला होतो. आणि वेदना कमी होतात. 70% कोको पावडर असलेले चॉकलेट पीरियड क्रॅम्पसाठी सर्वोत्तम मानले जाते.

Foods For Period Cramps
Working Efficiency : डोक्याला शॉट कशाला? ब्रेनलाही करा स्वीच ऑन स्वीच ऑफ, तज्ञ सांगतात, कसं?

आले

मासिक पाळीच्या दुखण्यासोबतच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा स्थितीत आल्याचे सेवन त्या सर्व लक्षणांमध्ये खूप फायदेशीर ठरते. आल्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. जे वेदना कमी करतात आणि पाळीच्या दरम्यान पोट फुगण्याच्या समस्या दूर करतात.

Foods For Period Cramps
Measles Infection : गोवरचा धोका, वेळीच ओळखा

अक्रोड

मासिक पाळी दरम्यान अक्रोड खाणे खूप फायदेशीर आहे. अक्रोडमध्ये  माशाप्रमाणे ओमेगा 3 फॅटी ऍसिडमध्ये समृद्ध आहेत. तसेच फायबरचा अधिक प्रमाणात आहे. ज्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि क्रॅम्पपासून आराम मिळतो. स्नॅक म्हणून तुम्ही तुमच्या आहारात अक्रोडाचा समावेश करू शकता.

Foods For Period Cramps
Sleeping Tips : सावधान! हिवाळ्यात सकाळी लवकर उठणं ठरू शकतं धोक्याच, शास्त्रज्ञांचा नवीन शोध

हळद

मासिक पाळी दरम्यान हळदीचे सेवन केल्याने पीरियड क्रॅम्प्स आणि ब्लोटिंगपासून खूप आराम मिळतो. हळदीमध्ये कर्क्युमिन असते, जे मासिक पाळीच्या वेदना, पेटके, मूड आणि पीएमएसच्या लक्षणांवर फायदेशीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.