Fridge Caring Tips : फ्रिज अन् भिंतीमध्ये किती अंतर असावं? तुमच्या एका चुकीमुळे येतं भरमसाठ वीज बिल

अनेकजण फ्रिज वापरतात पण फ्रिजला भिंतीपासून किती दूर ठेवावे, याविषयी कुणालाही फारसं माहिती नसतं.
Fridge Caring Tips
Fridge Caring Tipssakal
Updated on

Fridge Caring Tips: अनेकजण फ्रिजमुळे वीज बिल येतात म्हणून आरडाओरड करत असतात पण तुम्हाला माहिती आहे का कधी कधी आपल्या चुकीमुळेच वीज बिल जास्त येतं. फ्रिज अन् भिंतीमध्ये असलेल्या अंतरावरुनही कधी कधी वीज बिल कमा जास्त येतं. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? पण हे खरंय.

अनेकजण फ्रिज वापरतात पण फ्रिजला भिंतीपासून किती दूर ठेवावे, याविषयी कुणालाही फारसं माहिती नसतं. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेणार आहोत.

Fridge Caring Tips
Hot Food in Fridge : गरम अन्न फ्रीजमध्ये ठेवणं योग्य की अयोग्य? थर्मोडायनामिक्सच्या सिद्धांतामध्ये सापडले उत्तर

फ्रिज हल्ली प्रत्येकाच्या घरी दिसतो. काही लोक फ्रिजला हॉलमध्ये ठेवतात तर काही लोक फ्रिजला किचेन मध्ये ठेवतात. फ्रिज ठेवण्याची जागा यावर सुद्धा अवलंबून असते की किचेनमध्ये किती स्पेस रिकामी आहे.

तुम्ही बघितलं असेल की अनेकजण फ्रिजला भिंतीशी चिपकून ठेवतात कारण अनेक लोकांना फ्रिज आणि भिंतीत किती अंतर असावे, हे माहिती नसतं.

Fridge Caring Tips
Symbol of Shivsena Fridged: ठाकरेंना धक्का; वाचा निवडणूक आयोगाचे सविस्तर निर्देश

एक्सपर्ट्सच्या मते फ्रिज ला नेहमी भिंतीच्या 6-10 इंचच्या अंतरावर ठेवावे. कोणतीही फ्रिज स्वत:ला आतून थंड ठेवण्याचा प्रयत्न करते. थंड ठेवण्याच्या या प्रोसेस दरम्यान ग्रीलद्वारे आतून गरम हवा निघते. यामुळेच फ्रिजला कधीच भिंतीच्या जवळ ठेवू नये.

Fridge Caring Tips
Food in Fridge : फ्रीजमध्ये अन्न ठेवणं योग्य की अयोग्य?

जर तुम्ही फ्रिजला भिंतीच्या जवळ ठेवता तर गरम हवा व्यवस्थित बाहेर पडत नाही. अशात फ्रिजला आतून थंड होण्याच्या प्रोसेसला वेळ लागतो. यामुळे तुमचं वीज बिलही वाढू शकतं कारण या प्रोसेस दरम्यान अतिरीक्त विजेचा वापर होतो.

तुम्ही फ्रिजला भिंतीच्या 6-10 इंचच्या अंतरावर ठेवायला हवे. पण सोबतच फ्रिजला कधीच हीटर किंवा अन्य गरम वस्तूजवळ ठेवू नये.

जर आपण फ्रिजला गरम वस्तू जवळ ठेवले तर टेंपरेचरमध्ये अचानक फरक दिसून येईल. असे केल्यानंतर आपल्या फ्रिजमध्ये पाणी निर्माण होणार आणि या पाण्याचे बर्फ बनायला लागेल ज्यामुळे तुमच्या फ्रिजमध्ये दुर्गंधी निर्माण होणार आणि फ्रिज खराबही होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()