Freezer Temperature : उन्हाळ्यात फ्रिजचं तापमान 'या' नंबरवर ठेवा? एका चुकीमुळे होऊ शकतो घरात स्फोट

ज्यांच्या घरी फ्रिज आहे त्यांच्या मनात उन्हाळ्यात फ्रिजचं तापमान किती ठेवावं, हा प्रश्न कायम राहतो.
Fridge Caring Tips
Fridge Caring Tipssakal
Updated on

Fridge Caring Tips : हल्ली घरोघरी फ्रिज आहे. उन्हाळ्यात प्रत्येकाला फ्रिजची आवश्यकता असते. कमी किंमतीत आज चांगले फ्रिज उपलब्ध आहे. घरातील फ्रिजची योग्य काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. फ्रिजचा योग्य वापर न केल्यामुळे अनेकदा फ्रिज खराबही होऊ शकतो.

अनेकदा फ्रिज खराब झाल्यामुळे ब्लास्ट होण्याचाही धोका वाढतो.ज्यांच्या घरी फ्रिज आहे त्यांच्या मनात उन्हाळ्यात फ्रिजचं तापमान किती ठेवावं, हा प्रश्न कायम राहतो. अशात फ्रिज वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे. (Fridge Caring Tips what should be temperature level of fridge in summer one mistake make blast at home )

फ्रिजचं तापमान 'या' नंबरवर ठेवावं

अनेकजण फ्रिजचं तापमान हे 1 ते 5 नंबर पर्यंत ठेवतात. अनेकदा काही लोकं कमी नंबरवर फ्रिजला चालवतात ज्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेलं सामान खराब होण्याची शक्यता असते तर काही लोक चुकून या गोष्टी करतात.

फ्रिजचं मीडियम म्हणजेच 3 ते 4 नंबर पर्यंत तापमान सर्वात उत्तम असते. उन्हाळ्यात फ्रिजचं तापमान एवढंच असायला हवं. हिवाळ्यात अनेक लोक फ्रिज बंद ठेवतात. मात्र असे करणे चुकीचे आहे. हिवाळ्यात फ्रिजला 1 नंबरवर ठेवावं. जर तुम्ही फ्रिज बंद केली तर फ्रिजचं कंप्रेशर ठप्प होतं. पुन्हा फ्रिज सुरू करताना कंप्रेसर हीट होतं आणि फ्रिज खराब होतो.

Fridge Caring Tips
Hot Food in Fridge : गरम अन्न फ्रीजमध्ये ठेवणं योग्य की अयोग्य? थर्मोडायनामिक्सच्या सिद्धांतामध्ये सापडले उत्तर

या कारणाने होऊ शकतो ब्लास्ट

रेफ्रिजरेटर जर खराब झाला असेल तर खास करुन कंप्रेसर असणाऱ्या भाग तुम्ही या कंपनीच्या सर्विस सेंटरवर घेऊन जावा. कंपनीने ओरिजिनल पार्ट्सचा गॅरंटी दिली आहे. जर तुम्ही लोकल पार्ट्सचा वापर करत असाल तर यामुळे कंप्रेसरचा धोका वाढू शकतो.

Fridge Caring Tips
Side Effects Of Refrigerated Eggs : फ्रीजमध्ये अंडी ठेवणं ठरू शकतं धोक्याचं; वेळीच सावध व्हा!

उघडा ठेवू नका

फ्रिजमध्ये नेहमी बर्फाचा साठा असतो पण वारंवार फ्रिज ओपन केल्यामुळे फ्रिजमध्ये दमटपणाही असतो. त्यामुळे फ्रिज उघडी ठेवू नये किंवा वारंवार ओपन करू नये.

Fridge Caring Tips
Ice Cream Types : पहा एकापेक्षा एक टेस्टी आईस्क्रीम

ड्रेन आणि कॉइलची साफसफाई करा

फ्रिजमच्या मागे एक पाइप असतो जो पाण्याला बाहेर काढण्याचं काम करतो. जर हा पाइप बंद होत असेल तर बर्फ जास्त जमा होतात. यापासून वाचण्यासाठी तुम्ही वेळोवेळी साफ सफाई करू शकता.

फ्रिजच्या मागे एक कॉइल कंडेंसर असतं. ज्यामुळे फ्रिज थंडा होतो. त्यामुळे काळजी घेणे, साफ सफाई करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.