मैत्री म्हणजे एक असं नाजूक नातं, जे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला साथ देतं. हे नातं जीवनातील कठीण प्रसंगात एकमेकांना आधार देतं आणि आनंदाचे क्षण आणखी गोड बनवतं. कोणतंही नातं म्हटलं, की त्यात अपेक्षा येतातच. मात्र, जी व्यक्ती आपल्याला आपण आहोत, तसंच म्हणजे अगदी आपल्या गुणदोषांसकट स्वीकारते ती आपली मैत्रीण असं मानणारी अभिनेत्री वीणा जगताप सांगते, की तिचीही अशीच एक जीवाभावाची मैत्रीण आहे, ती म्हणजे तिची बालमैत्रीण वृषाली.