Friendship Day 2022 : फ्रेंडशिप डे’ कधी आहे?

फ्रेंडशिप डे चा नेमका इतिहास आणि महत्त्व काय आहे ?
Friendship Day 2022
Friendship Day 2022Esakal
Updated on

मैत्री हे जगातील एक असं नातं आहे की, याची निवड आपण स्वत: करतो. बाकी सर्व नाती बालपणापासून आपल्या सोबत जोडली जातात. आपल्या मनातील भावना प्रकट करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मैत्री.आपल्या आयुष्यातला खास किस्सांचा साथीदार म्हणजे मित्र मैत्रिणी असतात.

जे आपल्या प्रत्येक, दुःख, अडचणी अशा प्रत्येक टप्प्यावर आपल्या सोबत उभे राहतात. परिस्थिती काहीही असो तो आपल्याला कधीही एकटं सोडत नाही.अशाच जिवाभावाच्या मैत्रीचा सोहळा साजरा करण्याचा दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे असतो.

हा फ्रेंडशिप डे कधी आहे ? त्याचा नेमका इतिहास काय आहे या सगळ्यांची सविस्तर माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

या वर्षीचा फ्रेंडशिप डे’ कधी आहे ?

मैत्री या नात्याला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आणि उपक्रम या दिवशी आयोजित केले जातात. मैत्रीचा सुंदर दिवस साजरा करण्यासाठी UN ने 30 जुलै हा दिवस निवडला आहे . पण आपल्या भारतात फ्रेंडशिप डे हा ऑगस्ट महिण्यांच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. म्हणजे या वर्षीचा फ्रेंडशिप डे हा 7 ऑगस्ट 2022 रोजी आहे

Friendship Day 2022
Friendship Day: 1 ऑगस्ट आणि 30 जुलैच्या फ्रेंडशिप डेमध्ये काय फरक असतो?

फ्रेंडशिप डे’चा नेमका इतिहास काय आहे?

असेही सांगितल जातं की, 1935 मध्ये अमेरिकेत ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिकन सरकारने एका निर्दोष व्यक्तीचा जीव घेतला होता. ज्या व्यक्तीला मारलं त्याच्या मित्राने नंतर मित्राच्या आठवणीत आत्महत्या केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकी लोकांनी हा दिवस International Friendship Day म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकन सरकार समोर ठेवला होता. त्या निर्दोष व्यक्तीचा जीव घेतल्याने जनता संतापली होती. त्यामुळे अमेरिकन सरकारने तब्बल 21 वर्षांनी 1958 मध्ये तो प्रस्ताव मंजूर केला. यानंतर अमेरिकेच्या सरकारने हा दिवस मैत्री दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे घोषित केलं आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर 30 जुलै या दिवशी अधिकृतरित्या मैत्री दिवस साजरा केला जातो. आणि भारतात ऑगस्ट महिन्यात येणारा प्रथम रविवार या दिवशी फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येतो.

जगभरात आनंद आणि एकतेचा संदेश देण्यासाठी एक उपाय म्हणून हा दिवस साजरा केला जातो. फ्रेंडशिप डेच्या दिवशी, लोक त्यांच्या मित्रांना भेटून, पार्टी करून फ्रेंडशिप डे साजरा करतात. मैत्रीच्या नात्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि हा दिवस स्मरणीय तसेच विशेष बनवण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.