Friendship With Animals : आपल्यापेक्षा दहापट प्रेम प्राणी आपल्याला परत देतात; पेट्सची ही फ्रेंडशीप तुम्ही अनुभवलीये?

Friendship Day 2023 : तुमचा एकटेपणा घालवण्याचा हा उपाय सर्वोत्तम असल्याचं तज्ज्ञसुद्धा सांगतात.
Friendship With Animals
Friendship With Animalsesakal
Updated on

How Animals Are Special To Human Beings In Marathi :

प्रत्येक सजीवाला संवेदना असतात. मग ती झाडं असोत किंवा प्राणी. तुम्ही दिलेलं प्रेम त्यांना समजतं असं जाणकार लोक कायम सांगतात. पण ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत त्यांनी याचा अनेकदा अनुभवही घेतलेला असतो.

प्राण्यांचा सहवास अनेक अर्थांनी लाभदायक असतो असाही मानसशास्त्रज्ञांचा अभ्यास आहे. घरात एखादा पाळीव प्राणी असेल तर मानसिक तणाव कमी होतो, असं आता अभ्यासाअंती सिद्ध झालं आहेच. अशीच एक अवलिया या मूक प्राणी मित्रमंडळींच्या गोतावळ्यात भरभरून आयुष्य जगणारी सायली पिलाने. खास मैत्रीदिनानिमित्त 'सकाळ'शी तिने आपल्या प्राण्यांसोबतच्या मैत्रीविषयीचे अनुभव शेअर केले.

एकटेपणा घालवण्याचा आणि नैराश्य टाळण्याचा खात्रीशीर उपाय म्हणजे पाळीव प्राण्यांशी मैत्री. मुलांना आवडतात म्हणून घरात प्राणी पाळले जातात. हे मुके जीव तुमच्या सोबत मैत्री करण्यास कायम तयार असतात. आनंद, दु:ख, व्यथा, वेदना या सगळ्या भावनांना प्रतिसाद देत तुमचे सखे बनून राहतात. कोणताही पाळीव प्राणी तुमच्या भावना जाणणारा, त्या ओळखून तुम्हाला ताजेतवाने करणारा, तुमचा एकटेपण दूर करणारा, तुमच्या व्यथा वेदना निमूटपणे ऐकून घेणारा, ताणामुळे होणारा त्रास सहन करणारा तुमचा जीवलग होऊ शकतो.

अशीच कायम प्राण्यांच्या गोतावळ्यात रमणारी सायली ही तरुण पिढीचे प्रतिनिधीत्व करणारी प्राणी मित्र आहे. सध्या ती जंगली प्राणी पक्षांसंदर्भात काम करत असली तरी प्राणी प्रेमाचं बाळकडू घेऊनच ती लहानाची मोठी झाली. प्राण्यांवर प्रेम करावं, त्यांच्याशी मैत्री करावी, त्यांना जपावं हे तिला शिकवण्याची कधी गरजच पडली नाही. कारण ते संस्कार तिच्याही नकळत ती लहानपणापासूनच जगत होती.

Friendship With Animals
Friendship Day 2023 : तुम्हाला स्वतःला भेटायला वेळ आहे का? यंदाच्या मैत्रीदिनानिमीत्त अशी करा स्वतःशी मैत्री

सायलीचा जन्म एका शेतकरी कुटुंबातील. ती सांगते, "कुटुंब शेतकरी असल्याने मांजर, कुत्रा च नव्हे तर इतर सगळ्याच पाळीव प्राण्यांसोबत माझी जडणघडण झाली. घरातच अस वातावरण होते ज्यामुळे प्राण्यांबद्दल संवेदनशीलता निर्माण झाली. त्यात माझे वडिल मला मांजर, मनीमाऊ म्हणूनच हाक द्यायचे आणि मांजर हा आईचाही आवडता प्राणी त्यामुळे मांजर या प्राण्यासाठी माझ्या मनात एक खास जागा आहे."

"लहानपणापासून माझ्या आईला आणि वडीलांना, घरातल्या प्राण्यांना कुटुंबासारखे वागवताना पाहिलेले आहे. घरी प्राणी आजारी असेल तर रात्रभर त्यांच्या काळजीत जागताना पाहिले आहे. मीही या सगळ्यात असायचे. मग गाय, म्हैस, शेळी आजारी असताना वासराला, पारडाला, कोकराला बाटलीने दूध पाजायचे काम माझ्याकडे असायचे आणि मला ते मनापासून आवडायचेही. शेतात, रानात जाताना माझा कुत्रा नेहमी सोबत असायचा. मी आजारी असताना माझी मांजर माझ्यासोबत अंथरुणात बसून असायची." या आठवणी सांगताना सायली जणू पुन्हा त्याच विश्वात हरवून जाते.

Friendship With Animals
Friendship Day 2023: फ्रेंडशिप डे ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच का साजरा केला जातो? हे आहे त्यामागचे कारण

आपण शाळेत भूतदया शिकतो, म्हणजे प्राण्यांवर प्रेम करा हे शिकतो पण त्याचा अवलंब करण्याचे संस्कार हे घरातूनच सुरू होतात. मग तो प्राणी कोणता याला काहीच बंधन नसतं. यात केवळ कुत्राच नाही तर मांजर, गाय, बैल, म्हैस, घोडा, शेळी अशा प्राण्यांसोबत राहुनही एक सुंदर आणि आश्वासक असं नातं तयार होते. आणि या प्राण्यांनाही माया, प्रेम, आपुलकी, जवळीक यापेक्षा तुमच्याकडून काहीच नको असते. पण बदल्यात त्यांच्या जुळणार मैत्र मात्र अमूल्य आहे, असंही सायली खूप मनापासून सांगते.

आयुष्य सकारात्मकतेने भरते

प्राण्यांना आपल्याकडून केवळ प्रेम हवे असते. त्यांच्या सहवासामुळे माझ्यामध्ये अतिशय सकारात्मक बदल झालेले आहेत. आपण प्राण्यांच्या सहवासात मनापासून आनंदी असतो आणि कुठे न कुठे याचा परिणाम आपल्या रोजच्या व्यवहारावरसुद्धा होतोच. आतूनच जर आपण आनंदी असू तर आपला समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही अतिशय सकारात्मक झालेला असतो. माझ्या आंनंदी असण्यात आणि पर्यायान सकारात्मक जगण्यात या प्राणिमात्रांचा खूप मोठा वाटा आहे असं सायली आवर्जून सांगते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.