Friendship With Trees : झाडांंसोबत केली मैत्री अन् बहरलं आयुष्य; एका अवलियाची हटके कहाणी

Friendship Day 2023 : झाडांसोबतची मैत्री काही नवी नाही, पण ही कहाणी जरा खास आहे.
Friendship With Trees
Friendship With Treesesakal
Updated on

A Story Of A Man Who Lives Special Friendship With Trees :

निसर्ग हा माणसाचा खरा गुरू आणि मित्र आहे असं मानलं जातं, आपले जूने जाणते कायम सांगतात. पण हल्लीच्या सिमेंटच्या जंगलात आणि लॅपटॉप, मोबाईलच्या विश्वात हरवलेले लोक दिवसेंदिवस या खऱ्या निसर्गाच्या श्रीमंतीपासून लांब होत जात आहोत. जेव्हा या सगळ्याचे दुष्परिणाम आता आपल्याला जाणवू लागले आहेत तेव्हा एक मिणमिणता प्रकाश काहीच्या मनात चकाकतो आणि पुन्हा विझतो.

पण काही लोक असेही आहे ज्यांनी हा दिवा तेवत ठेवत संपूर्ण आयुष्य त्यासाठी वेचण्याचा पण केला. असाच एक अवलिया आहे बसवंत विठाबाई बाबाराव.

बसवंत यांनी आपल्या कुमार वयात एक अनामिक हूरहूर अनुभवली, ती कोणत्या व्यक्तीसाठी नव्हे तर बालपणीचा सवंगडी असणाऱ्या एका तोडून टाकलेल्या झाडासाठी. जी ते आजही मनात खोलवर अनुभवतात अन् मग झाडांमध्येच रमतात.

झाडांसोबतची मैत्री ही खूप काही भरभरून देणारी असते. भौतिक स्वरुपात झाडं आपल्याला खूप काही देतच असतात. मात्र त्याहून निराळा आत्मिक आनंद, विश्वास, धीर, देण्याचे काम झाडं करत असतात. माझ्या जीवनातील झाडांची मैत्री ही खूप अनमोल आहे, असं ते सांगतात.

'सकाळ'ला आपली कहाणी सांगताना बसवंत म्हणीले, नेमके आठवत नाही, पण मी आठवी किंवा नववीला असेल, तेव्हाची गोष्ट आहे. सुट्टीत आश्रम शाळेतून घरी आलो होतो. शेताकडे गेल्यावर कळलं की बांधावरील मोठे आंब्याचे झाड तोडले गेले आहे. ज्या झाडाच्या अंगाखांद्यावर खेळलं, लहानपणीचे बहुतांश वेळ घालवला होता ते झाड दिसत नाही. बराच वेळ त्या तोडलेल्या बुंध्यापाशी बसून होतो. सुट्ट्यांचे सर्व दिवस खूप वाईट गेले. सुट्ट्या संपवून परत शाळेत निघालो तेव्हा देखील सारखी झाडांची आठवण, हुरहूर सुरूच होती.

Friendship With Trees
Friendship Day 2023 : तुम्हाला स्वतःला भेटायला वेळ आहे का? यंदाच्या मैत्रीदिनानिमीत्त अशी करा स्वतःशी मैत्री

"आई-वडील, भाऊ बहीण, मित्र मैत्रिणी यांना जसे मिस करतो तसे आपण झाडालाही मिस करतो याची जाणीव त्यावेळी होऊ लागली. त्या झाडबद्दलची ही हुरहूर आजपर्यंत माझ्या मनात सुरूच आहे. कदाचित याच कारणामुळे मी झाडांच्या कामात गुंतलो गेलो. झाडं मित्र बनली. विशेषतः आंबा हा जिव्हाळ्याचा विषय बनला. आंब्याची जुनी गावरान वाणं, त्या जपल्या जातील यासाठी प्रयत्न कारणे ह्यासाठी प्रयत्न करू लागलो", असं ते म्हणाले.

ते म्हणतात झाडं, आपले दोन्ही हात पसरून आपल्याला बोलवत असतात. त्यांच्या जवळ जावं आणि त्यांना घट्ट मिठी मारावी. अनेकदा तसे करतो देखील. झाडांना मिठी मारून एक वेगळ्या प्रकारची अनुभूती होते, ती शब्दात सांगणे अवघड असतं. झाडे जपणे, त्यांचा बिया गोळा कारणे, रोपे बनवणे, त्यांच्या अधिवासात ते रुजवणे हे मग झाडांसोबत मैत्री करण्याचे मध्यम वाटू लागले. मग झाडं जपत आहेत अशी लोकं आवडू लागली. त्यांच्याशी मैत्री वाढू लागली. झाडांचे काम करणारी व्यक्ती, संस्था यांची मैत्री होऊ लागले.

झाडं लावणं, वाढवणं पुरेसं नाही

पण सोबतच याचीही जाणीव होती की, निव्वळ झाडं लावणं, आहेत ती वाचवणं हाच काही झाडांसोबत मैत्री जपण्याचा मध्यम नाही. अशी धोरणे आणि योजना, निर्णय ज्यातून झाडे, झाडांचा प्रदेश कमी होत जातो, अशा निर्णयांच्या विरोधी बोलणे, लिहिणे आवश्यक आहे. त्या बोलण्या-लिहिण्यातून ‘हरितदृष्टी’ नावाचे पुस्तक साकारलं.

Friendship With Trees
Friendship Day 2023 Wishes : मित्रमैत्रिणींना हे खास मेसेज पाठवा, मैत्रीचे नाते होईल अधिक मजबूत

सहज शक्य निसर्ग सहवास

उपजीविका नोकरी करीत असतांना नेहमीच जंगलात जाणे होत नाही, झाडांच्या सोबतीत वेळ घालवता येत नाही, मात्र आपण राहतो त्या परिसरात, घरात, बाल्कनीत, टेरेसावरती छोटी-मोठी झाडे, वेली, रोपे जपणे सहज शक्य आहे.

मोफत वाटली रोपं

याचा प्रयोग मी माझ्या घरीच केला. गच्चीवर घरमालकांना विश्वासात घेऊन चारशे काटेसावरीचे, दोनशे कवठाची, शंभर तामणाची, शंभर भोकराची, शंभर बेलाची असे नऊशे रोपे तयार केली होती. ती अनेकांना त्यांच्या जागेत लावण्यास मोफत वाटली. मंचर मधील बाळासाहेब कानडे यांच्या शाळेत आणि बांधावर यापैकी बरीच झाडे आजही छानपैकी डोलत आहेत. एकलहरे शाळेत दिलेला मधगोटी आंबा आज छान आंबे देतो. शाळेतील मुलं दर वर्षी आंबा खाण्याचा दिवस साजरा करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.