Friendship Day 2023 : मैत्रीची अशी एक व्याख्या आपल्याला करता येणार नाही. प्रत्येक व्यक्तीनुसार मैत्रीचा वेगळा अर्थ असू शकतो. मात्र तुम्हाला माहितीये का? इतरांआधी स्वत:शी मैत्री करणं किती महत्वाचं आहे ते. मित्रांसोबत असताना तुम्हाला स्वत:सोबतच्या मैत्रीचा विचारही कधी डोक्यात येत नाही. मात्र सुख, दु:ख, आयुष्यातील फेल्युअर्सच्या क्षणी इतर कोणाचीही सल्ला, मदत याव्यतिरिक्त तुमच्या खचलेल्या मनाला हवी असते ती तुमची साथ.
बेरच लोक मानसिक तणावातून जात असताना त्यांची स्वत:शी मैत्री नसते. त्यांना त्यांच्या कुठल्याच गुणांचं किंवा कौशल्यांचं कौतुक करावंस वाटत नाही. अशांची अगदी नकारात्मक वृत्ती होऊन बसते. मात्र याच क्षणी तुम्हाला तुमची साथ मिळाली तर तुम्ही यातून बाहेर पडू शकता. आता ते कसे ते थोडक्यात समजून घेऊया.
आपल्या आयुष्यात एखादी नकारात्मक गोष्ट घडली की आपण खचून जातो. आता सगळं संपलं, मी हारलो असे विचार मनी येतात. पण तुम्हाला अशा वेळी तुमच्याशी आंतरिक संवाद साधणे फार महत्वाचे आहे. इतरांचे टोमणे, उगाचचे सल्ले ऐकण्यापेक्षा एखाद्या शांत ठिकाणी शांत डोक्याने विचार करा. स्वत:शी बोला. हा वेडेपणा मुळीच नाही. हे करत असताना तुम्ही कुठे चुकले. तुम्ही यातून बाहेर पडण्यासाठी काय करू शकता याचा एकंदरीत विचार केल्यास तुम्हाला मार्ग नक्कीच मिळेल.
इतरांपेक्षा तुम्हाला जवळून कोणी ओळखत असेल तर ते स्वत: तुम्ही आहात. तुम्ही जिथे चुकलात त्याबाबत तुम्हाला जाणीव असेल तर तुमची चूक सुधारू शकाल. स्वत:ला प्रोत्साहित करणे हे इतरांनी प्रोत्साहित करण्याच्या तुलनेत कधीही चांगले.
बरेच लोक स्वत:शी कधीच संवाद साधत नाही. त्यांना स्वत:शी मैत्री किती महत्वाची याचा अंदाजच नसतो. अशावेळी तणाव वाढतो. आणि मानसिक धैर्य खचलेलं असतं. मग त्यांना स्वत:ला संपवून टाकणे हाच एक पर्याय डोळ्यासमोर दिसतो. त्यामुळे स्वत:शी संवाद फार महत्वाचा असतो. (Friendship Day)
अनेकांच्या बाबतीत त्यांना इतरांकडून न मिळालेलं कौतुक, न मिळालेली पुढे जाण्याची संधी यामुळे त्यांचं मानसिक मनोबल खचून जातं. अशावेळी तुमची तुमच्याशी घट्ट मैत्री असावी. "काही हरकत नाही, परत प्रयत्न करूयात" असे स्वत:ला समजवण्यास तुम्ही समर्थ असावे.
स्वत:शी मैत्री, स्वत:शी संवाद एकदा साधून बघा. तुम्हाला निश्चितच बरं वाटेल. पुढे जाण्यास बळ मिळेल.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.