Friendship Day 2024 : ‘फ्रेंडशिप डे’ निमित्त फिरायला जायचंय? मग, 'या' पद्धतीने व्हा तयार, दिसाल एकदम झकास.!

Friendship Day Outfit Ideas : आजच्या दिवशी अनेक जण डिनर पार्टीचा किंवा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात.
Friendship Day 2024
Friendship Day 2024 esakal
Updated on

Friendship Day 2024 : आज सगळीकडे मैत्री दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. भारतात दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. मैत्री दिनाला समर्पित असलेला हा दिवस प्रत्येकासाठी स्पेशल असतो. कारण, आपल्या आयुष्यातील मित्र-मैत्रिणी हे आपल्यासाठी एक कुटुंबच आहे.

आयुष्यात असे जिवाभावाचे आणि वाईट काळात मदतीला धावून येणारे मित्र-मैत्रिणी भेटणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. मैत्रीच्या या नात्याचा आदर आणि आनंद व्यक्त करण्यासाठी हा ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो.

या दिवशी मित्र-मैत्रिणी मिळून अनेक प्लॅन्स बनवतात. काही जण फ्रेंडशिप बॅंड बांधून हा दिवस साजरा करतात तर काही जण मित्र-मैत्रिणींना आवडणाऱ्या वस्तू गिफ्टच्या स्वरूपात देऊन हा दिवस साजरा करतात. आजच्या दिवशी अनेक जण डिनर पार्टीचा किंवा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात.

तुम्ही देखील आज फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला अभिनेत्रींचे काही लूक्स दाखवणार आहोत. त्या लूक्सपासून तुम्ही नक्कीच टिप्स घेऊ शकता. कोणत्या आहेत त्या टिप्स? चला तर मग जाणून घेऊयात.

को-ऑर्ड सेट

आजकाल को-ऑर्ड सेट्स हे तरूणींमध्ये लोकप्रिय आहेत. अभिनेत्री श्वेता तिवारीने देखील हा सुंदर को-ऑर्ड सेट परिधान केला आहे. तिच्या या लूकपासून तुम्ही नक्कीच प्रेरणा घेऊ शकता. बाहेर आऊटिंगसाठी आणि फिरायला जाण्यासाठी तुम्ही या प्रकारचा को-ऑर्ड सेट परिधान करू शकता. याप्रकारचे को-ऑर्ड सेट तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळू शकतील. या को-ऑर्ड सेटमध्ये तुमचा लूक नक्कीच सुंदर दिसेल.

बॅगी पॅंट अन् क्रॉप टॉप

फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने आज तुम्ही दिवसभरात कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर हा बॅगी पॅंट्स अन् क्रॉप टॉपचा ऑप्शन बेस्ट आहे. अभिनेत्री दिशा पाटणीने हा लूक मस्त कॅरी केला आहे.

या प्रकारच्या बॅगी पॅंट्स अन् क्रॉप टॉप सध्या ट्रेंडिंगला आहेत. या बॅगी पॅंट अन् क्रॉप टॉपमध्ये तुमचा लूक अधिक स्टायलिश दिसू शकेल. यावर ब्लॅक गॉगल लावायला विसरू नका.

ब्लॅक वनपीस

फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने तुम्ही मित्र-मैत्रिणींसोबत पार्टीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हा ब्लॅक वनपीस त्यासाठी एकदम परफेक्ट आहे.

अभिनेत्री मौनी रॉय या ब्लॅक वनपीसमध्ये मस्त दिसतेय. तिच्याप्रमाणे ब्लॅक वनपीस तुम्ही नक्कीच परिधान करू शकता. ब्लॅक आऊटफीटला साजेसा मेकअप अवश्य करा. यामुळे, तुमच्या लूकला चारचॉंद लागतील यात काहीच शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.