Friendship Day 2024 : यंदाचा ‘फ्रेंडशिप डे’ खास बनवायचांय? मग, मित्रांसोबत ‘या’ ठिकाणी जा फिरायला, तुमची ट्रीप होईल अविस्मरणीय.!

Friendship Day 2024 : जगातील सर्वात सुंदर नाते म्हणजे मैत्रीचे नाते होय.
Friendship Day 2024
Friendship Day 2024esakal
Updated on

Friendship Day 2024 : जगातील सर्वात सुंदर नाते म्हणजे मैत्रीचे नाते होय. आयुष्यात मित्र-मैत्रिणी असणे हे सर्वात मोठे सूख आहे. असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे आपल्या आयुष्यातील आनंद आणि दु:ख या दोन्ही गोष्टी शेअर करू शकतो. कधी हक्काने भांडू ही शकतो तर कधी प्रेमाने समजावून ही सांगू शकतो, इतकी जिवलग असते ती म्हणजे मैत्री.

मैत्री हे अनोख बंधन आहे. हे मैत्रीचे नाते आनंदाने साजरे करण्यासाठी आणि या मैत्रीप्रती आनंद व्यक्त करण्यासाठी जगभरात मैत्री दिन’ (Friendship Day) साजरा केला जातो. हा फ्रेंडशिप डे दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी साजरा केला जातो.

यंदा हा ‘फ्रेंडशिप डे’ भारतात ४ ऑगस्टला सर्वत्र साजरा केला जाणार आहे. मैत्रीचा हा दिवस साजरा करण्यासाठी तुम्ही मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन नक्कीच करू शकता. त्यासाठी, आज आम्ही तुम्हाला भारतातील काही सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. कोणती आहेत ही ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.

Friendship Day 2024
Friendship Day Video : खऱ्या मैत्रीची व्याख्या काय? आयुष्याच्या या टप्प्यापर्यंतसुद्धा...

उदयपूर

राजस्थान या राज्यातील सर्वात लोकप्रिय शहर म्हणून उदयपूरची ओळख आहे. पर्यटनासाठी हे शहर जगप्रसिद्ध असून ‘तलावांचे शहर’ म्हणून या शहराची खास ओळख आहे.

उदयपूर
उदयपूर Pinterest

ऑगस्टमध्ये येथील वातावरण आल्हाददायक असते. या शहरातील ऐतिहासिक महाल, हवेलींना तुम्ही भेट देऊ शकता. तसेच, येथील नीरव शांतता आणि मनमोहक नजारा तुम्हाला हवाहवासा वाटेल.

गोवा

मित्र-मैत्रिणींसोबत मजा-मस्ती करण्यासाठी गोवा हे सर्वात सुंदर ठिकाण आहे. पावसाळ्यात गोव्यातील वातावरण अतिशय सुंदर असते.

गोवा
गोवाPinterest

येथील नयनरम्य समुद्रकिनारे, किल्ले आणि चर्च यांना तुम्ही भेट देऊ शकता. तसेच, येथे मनसोक्त शॉपिंगचा आनंद घेऊ शकता.

महाबळेश्वर

महाराष्ट्रातील थंड हवेचे सुप्रसिद्ध ठिकाण म्हणून महाबळेश्वरची खास ओळख आहे. हे एक सुंदर हिलस्टेशन असून तुम्ही मित्रांसोबत येथे मस्त वेळ घालवू शकता.

महाबळेश्वर
महाबळेश्वरPinterest

येथील निसर्ग, धबधबे, स्ट्रॉबेरीची शेती आणि मंदिरे तुम्हाला भुरळ घालतील यात काही शंका नाही.

हंपी

कर्नाटक राज्यातील सुप्रसिद्ध ठिकाण म्हणजे हंपी होय. हंपी हे ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध असून हंपीचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आला आहे.

हंपी
हंपीPinterest

येथील सुंदर प्राचीन मंदिरे तुम्ही पाहू शकता. यासोबतच येथील प्रेक्षणीय स्थळांना तुम्ही भेट देऊ शकता.

कुर्ग

'भारताचे स्कॉटलंड' अशी ओळख असलेले कुर्ग हे पर्यटनासाठी लोकप्रिय ठिकाण आहे. हे ठिकाण कर्नाटक राज्यात स्थित असून, ऑगस्टमध्ये येथील वातावरण मनमोहक असते.

कुर्ग
कुर्गPinterest

हा परिसर, कॉफीचे मळे, पर्वतीय प्रदेश आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही मित्रांसोबत ट्रेकिंगचा आनंद देखील घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.