Friendship Day: मित्र मैत्रिणींना द्यायच्या आहेत खास शुभेच्छा ? मग वाचा Friendship Day Special Quotes

या 'फ्रेंडशिप डे' साठी तुमच्या मित्रमैत्रीणींना जर का तुम्हाला खास शुभेच्छा द्यायच्या असतील तर खालील पाच QUOTES नक्की वाचा.
Friendship Day 2022:
Friendship Day 2022:esakal
Updated on

Friendship Day: दरवर्षी फ्रेंडशिप डे जवळ येताच मित्रमैत्रीणी त्यांच्या जीवलग मित्रांसाठी काहीतरी खास करण्याच्या तयारीत असतात. यावर्षी मित्रमैत्रींसाठीचा अगदीच खास दिवस उद्या म्हणजेच ७ ऑगस्टला येतोय. तरूणांबद्दल सांगायचं झाल्यास कुठलाही सण किंवा महत्वाचा दिवस आला की तरूण मंडळी त्यांच्या व्हॉट्सअॅप किंवा इन्स्टाला आधी त्या दिवसाचं स्टेटस किंवा स्पेशल QUOTE टाकतात. या 'फ्रेंडशिप डे' साठी तुमच्या मित्रमैत्रीणींना जर का तुम्हाला खास शुभेच्छा द्यायच्या असतील तर खालील पाच QUOTES नक्की वाचा.

मित्रांना द्या तुमच्या भाषेत तुमच्या भावना पोहोचवणाऱ्या शुभेच्छा

कधी रागात तर कधी प्रेमानं सांगतेस गोष्टी जगाच्या

तुला माहिती असतात काही वेदना मनाच्या

स्पष्ट बोली अन् खऱ्याची बाजू घेत मला समजवी

खरंच वाटतं आपली मैत्री आहे जगावेगळी

मैत्री दिनाच्या प्रेमळ शुभेच्छा

पावसात जितका ओलावा नाही तितका प्रेमाचा जिव्हाळा आपल्या नात्यात आहे,

ही नुसतीच मैत्री आहे की जगावेगळं प्रेम आहे, मैत्री दिनाच्या प्रेमळ शुभेच्छा

मैत्री म्हणजे अलगद स्पर्श मनाचा, मैत्री आणि प्रेम म्हणजे अतुट बंध आयुष्याचा.

मैत्री दिनाच्या प्रेमळ शुभेच्छा

आठवणींच्या भोवऱ्यात एक क्षण आमचा असो,

बहरलेल्या फुलांमध्ये एक फुल आमचे असो,

जेव्हा तुम्ही मित्रांची आठवण काढाल,

तेव्हा त्या नावांच्या यादीत एक नाव आमचंही असो

फ्रेंडशिपडेच्या निमित्तानं तुम्ही मित्रमैत्रींणींना या खास शुभेच्छा द्या. त्यांचा दिवस आणि मूड नक्कीच चांगलं होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.