Friendship Day 2024 : वणव्यामध्ये गारव्या सारखा..! खरा मित्र कसा ओळखावा ? जाणून घ्या सोपी व्याख्या

Friendship Day 2024 : यंदा हा 'फ्रेंडशिप डे' ४ ऑगस्टला (रविवारी) साजरा केला जाणार आहे.
Friendship Day 2024
Friendship Day 2024esakal
Updated on

Friendship Day 2024 : आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्री फार महत्वाची आहे. मैत्रीचे नाते जगातील सर्वात सुंदर नाते मानले जाते. लहानपणापासून ते तारूण्यापर्यंत आपले आयुष्यात अनेक मित्र-मैत्रिणी बनतात. परंतु, काही मित्र असे असतात की, ज्यांच्यासोबत आपली मैत्री घट्ट असते. त्यांना विसरणे सर्वात कठीण असते, अशा मित्र-मैत्रिणींसोबतची मैत्री आयुष्यभर टिकून राहते.

अनेकांचे बालपणीचे मित्र-मैत्रिणी नेहमी एकत्र राहतात. त्यांच्यासोबत तुम्ही आयुष्यातील अनेक सुख-दु:खाचे क्षण अनुभवलेले असतात. मैत्रीप्रती आनंद आणि आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ऑगस्ट महिन्यात ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो.

हा फ्रेंडशिप डे ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी साजरा केला जातो. यंदा हा फ्रेंडशिप डे ४ ऑगस्टला (रविवारी) साजरा केला जाणार आहे. या मैत्रीदिनानिमित्त आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुम्हाला खरा मित्र किंवा मैत्रिणीमध्ये दिसून येतील. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

Friendship Day 2024
Friendship Day 2024 : विकतचं कशाला? तुमच्या हक्काच्या मित्रांना द्या तुम्ही स्वत: बनवलेले 'हे' खास गिफ्ट्स.!

कठीण काळातील साथ

आपले मित्र-मैत्रिणी आपल्या कठीण काळात सोबत असणे, खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही कठीण काळातही एकमेकांच्या सोबत असाल तर तुमची मैत्री आणखी घट्ट होते आणि हीच खरी मैत्री असते. तुमच्या वाईट काळात तुम्हाला साथ देणाऱ्या मित्रांना तुम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. अडणीच्या किंवा कठीण काळात मैत्री जपणारे मित्र नेहमीच लक्षात राहतात.

जे तुमच्याशी कनेक्टेड असतील

आपल्या आयुष्यात मित्र-मैत्रिणी तर भरपूर असतात. परंतु, यातील खरे मित्र-मैत्रिणी हे तुमच्याशी नेहमीच कनेक्टेड असतील. हे नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर ते तुमची विचारपूस करतील, तुमची काळजी घेतील आणि तुम्हाला योग्य ते सल्ले देतील. जेव्हा तुमचे हे खरे मित्र-मैत्रिणी तुमच्याशी घट्ट जोडले गेले असतील, जे तुमच्याशी कनेक्टेड असतील तेव्हा तुमचे नाते मजबूत होईल.

चुकलात तर खडसावतील

नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा खरा मित्र किंवा मैत्रिण तुम्ही जर कुठे चुकत असाल किंवा चुकीच्या मार्गांनी जात असाल, तर तो किंवा ती वेळीच तुम्हाला अडवेल. तुमच्या चुका तुमच्या लक्षात आणून देईल. प्रसंगी तो किंवा ती तुम्हाला खडसावेल आणि तुम्ही कुठे चुकलात? हे लक्षात आणून देतील. हेच खरे मित्र-मैत्रिणी आयुष्यात असणे ही फार मोठी गोष्ट आहे. खऱ्या मैत्रीची हीच व्याख्या आहे.

जुनी मैत्री

असे म्हटले जाते की, तुमची मैत्री जितकी जुनी असेल, तितके तुमच्यातील मैत्रीचे नाते आणखी घट्ट आणि मजबूत होते. खास करून शाळा, कॉलेजमधील मित्र-मैत्रिणींसोबतची आपली मैत्री फार जुनी असते. परंतु, यातील तुमचे खरे मित्र-मैत्रिणीच तुमच्यासोबत कनेक्टेड असतात. अशी मैत्री आयुष्यभर टिकते आणि तुमच्यातील नाते आणखी घट्ट होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.