FriendShip Day: मैत्रीचा चिरंतन सोहळा...

FriendShip Day: बघा न पांडुरंग आणि वारकऱ्यांची ही अतूट मैत्रीचे साक्षीदार आपण सगळेच आहोत. ‘अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर…’ म्हणत हा सोहळा म्हणजे मैत्रीचा उत्सवच.
FriendShip Day:
FriendShip Day: Sakal
Updated on

पृथा वीर

नुकतीच आषाढी वारी झाली आणि आता श्रावणोत्सव सुरू होणार. तत्पूर्वी मैत्रीचा हक्काचा दिवस फ्रेंडशिप डे येतोय. प्रसंग, निमित्त वेगळे. पण आयुष्याचा आनंद देणारे हे क्षण पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात. वर्षे उलटली पंढरीची वारी सुरू आहे.. काळ, वेळ बदलली, पण मैत्री अजूनही तशीच आहे.. बघा न पांडुरंग आणि वारकऱ्यांची ही अतूट मैत्रीचे साक्षीदार आपण सगळेच आहोत. ‘अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर…’ म्हणत हा सोहळा म्हणजे मैत्रीचा उत्सवच.

पंढरपूरची वारी.. म्हणजे काय असा प्रश्न मला नेहमी पडतो. मैलोनमैल पायी चालायचे, वाटेत अभंग म्हणायचे, वाटेत भेटणाऱ्याला नमस्कार घालत त्यांना माऊली संबोधायचे. वर्षानुवर्षे ही परंपरा महाराष्ट्रात सुरू असताना या वारीला कधीही अडचण आली नाही.  आजही खेड्यातली माणसं या वारीमध्ये दरवर्षी जातात. या अद्भूत वारीचे महत्त्व आधुनिक काळातही टिकून नाही तर दरवर्षी या वारीच्या लोकप्रियतेत भर पडली आहे. 

‘टाळ घोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती… ’ असे वारीचे सुंदर वर्णन आहे. या वारीमध्ये कुणी आरोग्य शिबिर घेतं, कुणी अन्नदान करतं. तर कुणी वारकऱ्यांची सोय करतं. ‘भेदाभेद अमंगळ’ म्हणत आषाढी वारी सुरू आहे. पंढरपूरच्या वाटेवर वेगवेगळ्या संतांच्या पालखी निघतात. त्यांचा तो रिंगण सोहळा, शिस्तबद्ध संचलन बघताना या वारकऱ्यांचा हेवा वाटतो. 

लाखोंचे पाय पंढरपूरच्या वाटेवर लागत असतील तेव्हा तो मार्गही सुखावत असेल. पुरुषांच्या बरोबरीने महिलाही तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन वारीत सहभागी होतात. म्हणजे वारी ही स्त्री-पुरुष भेदही मिटवणारी. ‘भेटी लागी जिवा..’ म्हणत पंढरपूरच्या दिशेने वारकरी धाव घेतात आणि हे दृश्य बघण्यासाठी दुतर्फा गर्दी जमते.

चंद्रभागेच्या तीरी जेव्हा ही वारकरी पोचते तेव्हा वारकरी एकमेकांना मिठी मारतात आणि लहान असो वा मोठा एकमेकांचे चरणस्पर्श करतात. ती चंद्रभागा सुद्धा हे दृश्य बघून आपले बाहू विस्तारते. तिच्या पाण्याचा गोडवा म्हणजे ममत्व. वारी ममत्व शिकवते. कधीकाळी संतांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या पंढरपूरमध्ये आजही जेव्हा लाखो वारकरी येतात तेव्हा ते दृश्य विहंगमच असते. असे म्हणतात की, पंढरपूर मंदिराचे नुसते शिखर दर्शन झाले तरीही वारकरी सुखावतात. खरेही असावे. कारण त्या विठ्ठलानेही वारकऱ्यांची साथ कधी सोडली नाही. तोही या वारकऱ्यांसोबतच वारकरी बनून या वारीत

FriendShip Day:
Friendship Day 2024: 'या' भेटवस्तू तुमच्या मित्रांना ठेवतील दिर्घकाळ निरोगी अन् तंदुरूस्त

सहभागी होतो. स्वर्गीय सुखापेक्षाही पृथ्वीवरचे हे मैत्री पर्व बघून स्वर्गातील देवांनाही हेवा वाटत असावा. वारी केवळ यात्रा नाही तर हा चिरंतन सोहळा आहे. म्हणूनच वारी भाषा जोडते, संस्कृती जोडते. मुख्य म्हणजे ती भेदाभेद मिटवते आणि ती शिकवते की, ध्येय कितीही कठीण असले तरीही तुला चालावे लागेल.

तुला तुझ्या उद्दिष्टापर्यंत पोचावे लागेल. मैत्रीचे हे पर्व खूप काही सांगून जाते. मैत्री गरीब- श्रीमंत, जाती- धर्म-पंथावर होत नाही. ती होते ती केवळ मैत्रीवरच होते. म्हणूनच गरीब सुदाम्याचे पोहे सुद्धा श्रीकृष्ण तितक्याच आवडीने खातात. मैत्रीचे हे पर्व साजरे करत आजचे मुक्तपीठ सर्व मित्र- मैत्रिणींसाठी…

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.