Friendship Day: आजही का भगवान श्री कृष्ण आणि सुदामाची मैत्री अजरामर आहे?

द्वारका हे संपूर्ण सोन्याचे शहर होते. या नगरात लोक खूप सुखी आणि समृद्ध होते.
Friendship Day 2023
Friendship Day 2023Esakal
Updated on

भारतीय परंपरेत मैत्रीला नेहमीच महत्त्व दिले गेले आहे. मित्र हा आपल्या चांगल्या वाईट दोन्ही गोष्टींचा साक्षीदार असतो.म्हणून मैत्रीचे नातचं इतर सगळ्या नात्यापेक्षा वेगळं असतं.जेव्हा जेव्हा मैत्री या विषयावर चर्चा सुरु होते तेव्हा तेव्हा द्वापार काळातील कृष्ण-सुदामाच्या मैत्रीचे उदाहरण द्यायला लोक विसरत नाहीत. कृष्ण आणि सुदामाची मैत्री ही सुवर्ण अक्षराने लिहली गेली आहे.

आता सविस्तर समजून घेऊ या की, कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीला एवढी प्रसिद्धी का मिळाली ?

भगवान श्रीकृष्णाचा बालमित्र असलेला सुदामा हा अत्यंत गरीब ब्राह्मण कुटुंबातील होता. त्यांची परिस्थिती इतकी हालाकिची होती की, त्यांच्या लहान मुलांचे पोट भरणेही त्याला कठीण झाले होते. एके दिवशी गरिबीला कंटाळून सुदामाच्या पत्नीने त्याला सांगितले की आपण उपाशी राहू शकतो पण मुलांना उपाशी पाहू मला खूप त्रास होतो. हे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

Friendship Day 2023
Friendship Day 2023: मैत्री असावी तर अशी ! फासावर चढतानासुद्धा मित्रांना मिठी मारण्याची होती शेवटची इच्छा

हे ऐकून सुदामा अतिशय दुःखी झाला आणि त्याने आपल्या पत्नीला यावर उपाय का असा प्रश्न विचारला.तेव्हा सुदामाची पत्नी म्हणाली - तुम्ही मला नेहमी सांगत राहता की द्वारकेचा राजा कृष्ण हा तुमचा मित्र आहे. मग त्याच्याकडे तुम्ही एकदा का जाऊ नये?

तो तुमचा बालमित्र आहे, आपली ही अशी अवस्था पाहून तो न मागता आपल्या काहीतरी देईल.आपल्या मित्रांकडे मदत मागायला जाण्यासाठी सुदामा मोठ्या कष्टाने तयार झाला. त्याने आपली पत्नी सुशीला हिला सांगितले की तो रिकाम्या हाताने मित्रांच्या घरी जाऊ नाही शकत. पण भेटवस्तू द्यायला त्याच्या घरात अन्नाचा दाणाही नव्हता मग असे म्हणतात की सुदामाच्या सांगण्यावरून त्याची पत्नी सुशीला हिने शेजारच्या घरून चार मुठी तांदूळ आणले त्याचा भात शिजवून सुदामाने तो तांदूळाचा भात कृष्णाला भेट देण्यासाठी एका रुमालात बांधला.

आणि सुदामाने द्वारकेकडे प्रस्तान केले. सुदामा जेव्हा द्वारकेला पोहोचला तेव्हा तेथील वैभव पाहून त्याला आश्चर्य वाटले. द्वारका हे संपूर्ण सोन्याचे शहर होते. या नगरात लोक खूप सुखी आणि समृद्ध होते. सुदामा लोकांना विचारत कृष्णाच्या महालात पोहोचला आणि दारात उभ्या असलेल्या पहारेकऱ्यांना सांगितले की त्याला कृष्णाला भेटायचे आहे. पण त्याची अवस्था पाहून द्वारपालांनी सुदामा विचारले काय काम आहे तुझे ? तेव्हा सुदामाने सांगितले की, कृष्णा हा माझा बालमित्र आहे.

Friendship Day 2023
Friendship Day 2022: Friends ला द्या अनोखी भेट, पहा एकापेक्षा एक भारी गिफ्टची लिस्ट

सुदामाचे उत्तर ऐकून द्वारपाल राजवाड्यात गेला आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांना सांगितले की एक गरीब ब्राह्मण तुम्हाला भेटायला आला आहे. तो आपले नाव सुदामा सांगत आहे. सुदामा हे नाव ऐकताच भगवान श्रीकृष्ण सुदामाला घेण्यासाठी अनवाणी पायानी प्रवेशद्वाराकडे धावले.

द्वारकेचा राजा आणि एक गरीब ब्राम्हण यांच्यात इतकी अटूत मैत्री कशी असू शकते ? हा प्रश्न तिथे उपस्थित असलेले लोकांना पडला असावा.प्रवेशद्वारावरून भगवान श्रीकृष्ण सुदामाला त्यांच्या महालात घेऊन गेले आणि त्यांच्या बालपणीच्या दिवसांची आठवण करून दिली.

कृष्णाने सुदामाला विचारले की वहिणीने माझ्यासाठी काय पाठवले आहे. सुदामा गोंधळून गेला आणि सोबत रुमाल आणलेला तांदूळाचा भात लपवू लागला. हे पाहून कृष्णाने त्याच्याकडून तांदुळाचा भात बांधलेला रुमाल हिसकावून घेतला.

भगवान श्रीकृष्ण सुदामाने आणलेला तो भात कोरडा खाऊ लागले. सुदामाची गरिबी पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू आले. नंतर पुढे सुदामा काही दिवस द्वारकापुरीत राहिला पण तो मनातल्या मनात संकोचून असल्यामुळे तो कृष्णाला काहीही विचारू शकला नाही. निघताना भगवान कृष्ण त्यांना काही अंतरावर सोडायला आले आणि त्यांनी सुदामाला घट्ट मिठी मारली. सुदामा जेव्हा आपल्या घरी परतू लागला तेव्हा रस्त्याने चालत असतांना तो विचार करू लागला की आपल्या पत्नीने आपण काय आणले आहे असे विचारले तर तिला काय उत्तर द्यावे ?

थोड्यावेळात सुदामा घरी पोचला तेव्हा त्याला त्याची झोपडी दिसली नाही. त्याची धर्मपत्नी एका सुंदर घरातून येतांना दिसली. सुदामाच्या मुलांनी आणि बायकोने सुंदर असे कपडे परिधान केलेले होते. सुशीला सुदामाला म्हणाली, कृष्णाचा महिमा पाहिला का?

आपले दारिद्र्य दूर करून कृष्णाने आपल्यावरचे सगळे दुःख दूर केले आहेत. सुदामाला कृष्णाचे आपल्यावर असलेले प्रेम आठवून सुदामाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
मित्रांनो, हीच होती कृष्ण आणि सुदामाची मैत्रीची गोष्ट. असे म्हणतात की कृष्णाने सुदामाला स्वतःहून श्रीमंत केले होते. या मैत्रीच्या नात्यांचे उदाहरणे लोक आजही देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.