Fruit Eating Rules : रात्रीच्यावेळी हे फळ कधीच खाऊ नये, कारण...

रात्रीच्यावेळी फळ खाणं नुकसान दायक ठरू शकतं
Fruit Eating Rules
Fruit Eating Rulesesakal
Updated on

Fruit Eating Rules :  आपल्या आहार शास्त्रात खाण्या पिण्याबाबतचे अनेक नियम सांगण्यात आले आहेत. त्यापैकी कोणत्या वेळी काय खावं? याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण भूक लागली, पोटात कावळे ओरडायला लागले या कारणाखाली आपण कधीही काहीही खात सुटतो आणि त्याचा आपल्या शरीराला त्रास होतो.

जेवणाबद्दल असा नियम आहे की सकाळी नाश्ता पोटभर करा, त्यानंतरच जेवणही अगदी पोट भरेल इतपत करा पण रात्रीचे जेवण हे कमी घ्या. जास्त जेवण तुम्हाला आजारी पाडू शकतं. अगदी तसच फळ खाण्याच्या बाबतीतही एक महत्त्वाचा नियम सांगितलेला आहे.

Fruit Eating Rules
Mansoon Fruit Precaution : पावसाळ्यात आजारांवर ‘फलाहार’ गुणकारी; या फळांचा करा आहारात समावेश

आता तुम्ही म्हणाल की, फळ खाण्यात कसला नियम. फळ तर सगळ्या सिझनला कोणत्याही वेळी खाणं फायद्याचच ठरतं. पण, तुम्हाला माहितीय का की, रात्रीच्यावेळी फळ खाणं नुकसान दायक ठरू शकतं.

फळे खाण्याबाबत असे म्हटले जाते की रात्रीच्या वेळी फळे खाऊ नयेत. कारण फळांमध्ये कर्बोदके आढळतात. रात्री जास्त कार्ब्स घेतल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. म्हणूनच रात्री फळे न खाण्याचा सल्ला दिला जातो. पण याचा अर्थ असा नाही की रात्री फळे खाऊ शकत नाहीत.

चरक संहितेमध्ये सांगण्यात आलं आहे की, केळी खाताना किंवा नंतर काही वेळासाठी काही चुका करू नये. याने शरीराला नुकसान पोहोचू शकतं. ही माहिती मलेशियाचे मेडिकल न्यूट्रिशनिस्ट विपिन यांनी शेअर केली आहे. चला जाणून घेऊ याबाबत...

Fruit Eating Rules
Fruit Side Effect : रिकाम्या पोटी ही फळ खाऊ नयेत, पण का?

रात्री खाऊ नये केळी

आयुर्वेदानुसार, केळं रात्री खाऊ नये. हे फळ कफ वाढवणारं मानलं जातं. त्यामुळे हे रात्री खाल्ल्याने कफ, खोकला, छातीमध्ये जडपणा, छातीत वेदना होऊ शकते. केळी खाण्याची योग्य वेळ दिवसाच आहे

आयुर्वेदात कोणतंही फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्यास मनाई केली आहे. हा नियम केळी खाण्यावर लागू पडतो. हे फळं पचनाला जड असतं आणि पाण्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, पोटदुखी, अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. केळी खाल्ल्यावर 1 तासाच्या अंतराने तुम्ही पाणी पिऊ शकता.

Fruit Eating Rules
Harmful Fruit Combinations: पपईसोबत चुकूनही खाऊ नका लिंबू, नाहीतर होतात हे गंभीर साईड इफेक्ट्स

कशासोबत खाऊ नये केळ

दूध-केळी किंवा बनाना शेकला बॉडी बनवण्याचा देशी उपाय मानला जातो. पण आयुर्वेदात याला शरीरासाठी नुकसानकारक मानलं जातं. केळी आणि दूध-दही इत्यादी डेअरी प्रॉडक्ट कफ वाढवण्याचा काम करतात. हे सोबत खाल्ल्याने शरीरात कफ दोष वाढू शकतो आणि पचनही खराब होतं.

Fruit Eating Rules
Fruits For Weight Loss: जीममध्ये न जाताच 'ही' फळं खाल्ल्याने Belly Fat होईल कमी

फळे खा पण...

रात्री फळे खाण्यास मनाई आहे. पण याचा अर्थ असा नाही की रात्री फळे खाऊ शकत नाहीत. तुम्ही रात्री फळे खाऊ शकता. फळे खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. पण झोपण्याच्या किमान 3 तास ​​आधी काहीही खाऊ नये. फळ ७ वाजता खाऊन तुम्ही १० ते ११ च्या दरम्यान झोपलात तरी चालू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.