Fruits Buying Tips : मुलांना गोड खायला खूप आवडतं. त्यामुळेच ते सतत चॉकलेट, आईस्क्रीम खात असतात. मुलांची ही सवय पालकांना आवडत नाही.कारण सतत चॉकलेट खाणं मुलांच्या दातांसाठी आणि आरोग्यासाठी हानिकारक असतं. बरं, ही सवय मोडायची असेल तर मुलांना काहीतरी गोडच खायला दिलं पाहिजे.
तुम्ही फळं ट्राय करू शकता. पण आजकालची फळं खरंच गोड आहेत का? ती केमिकलमध्ये पिकवली जातात. त्यामुळे त्यांच्यात म्हणावा तसा गोडवा नसतो.
मुलांना पाणीदार, जास्त पौष्टीक असलेली फळं खायला दिली जातात. यात जसं सफरचंद येतं तसंच पपई सुद्धा मुलांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ठ मानली जाते. त्यामुळेच मुलांची चॉकलेट गोळ्या खायची सवय मोडायची असेल तर मुलांना गोड पपई खायची सवय लावा.
पपई खरेदी कराताना मोठा प्रश्न असतो की, पपई गोड आहे की नाही हे कसं ओळखावं. कारण ही ट्रिक कलिंगडच्या बाबतील लागू करायची झाली तर कलिंगड कापून ते किती लाल आहे यावर गोड आहे की नाही असं ठरतं. पण पपई गोड आहे की नाही कसं ओळखाल?, यासाठीच काही टिप्स आपण पाहुयात.
पपईचे फायदे काय?
पपई स्वादिष्ट तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी. सहज पचणारे फळ आहे. पपई भूक आणि शक्ती वाढविते. प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि कावीळ यासारख्या रोगांपासून मुक्ती देणारे हे फळ आहे. पपई खाण्याचे खूप फायदे आहेत.
पपई हे फळ सगळीकडे उपलब्ध आहे. पपई हे आजारपणात देखील खाता येते आणि याचे जास्त दुष्परिणाम नसतात. पिकलेली पपई खूप स्वादिष्ट असते आणि याच्यात खनिज, पोषक तत्व आणि विटामिन मोठ्या मात्रेत उपलब्ध असतात. म्हणून पपई आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे.
जेव्हाही तुम्ही पपई खरेदी करण्यासाठी बाजारात जाल तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवा. पपई खरेदी करताना हे लक्षात ठेवा की फार भारी पपई खरेदी करू नका. वास्तविक, जाड आणि कडक सालीमुळे पपईचे वजन अधिक असते. त्यांची चव फारशी चांगली नसते.
पपईचा सुगंध
पपईच्या वासावरूनही तुम्ही पपईच्या चवीचा अंदाज लावू शकता. पपईतून ओला वास येत असेल तर याचा अर्थ ती चांगली पिकलेली आणि गोडही आहे. मुलांनाही त्याची चव नक्कीच आवडेल.
डाग असलेली पपई
जर पपई पिकलेली असेल आणि त्यातून वासही येत असेल, परंतु त्यावर लहान मोठे पांढरे किंवा हिरवे डाग दिसत असतील तर ती अजिबात घेऊ नका. हे हिरव्या रंगाचे बुरशी आहेत आणि ते आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. याशिवाय अशी पपई चवीला खराब असते.
रंग
लोक जेव्हा बाजारातून पपई खरेदी करतात त्यावेळी ते फक्त रंग बघून खरेदी केला जातो. पपईचा पिवळा रंग पाहून तो पिकला असावा असे मानून त्याला घरी आणले जाते. परंतु हे ओळखण्याची एक वेगळी पद्धत आहे. यासाठी तुम्ही त्यावरती असलेल्या पिवळ्या शिरांना पाहू शकता. पपईवर पिवळा किंवा नारंगी रंगाच्या शिरा असतील तर तो पिकलेला आहे असे समजावे. थोडा हिरवट कलर असेल तर ते पपई खरेदी करू नये.
पपईची साल
जर पपई वजनाने जास्त असेल किंवा त्याचे साल मोठे असेल तर समजुन जा की तो पूर्णपणे पिकलेला आहे. त्यापद्धतीने पपईच्या पुढील आणि मागील या दोन्ही बाजू चेक करून घ्या. जर पपईमध्ये हिरवट रंग दिसत असेल किंवा दाबल्यानंतर ते कडक वाटत असेल तर समजा की तो खरेदी करण्यास योग्य नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.