सध्या पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे तुम्हाला मार्केट मध्ये फळ ही मुबलक प्रमाणात मिळू शकतात. उद्यापासून श्रावण महिना सुरु होत आहे. हा श्रावणाचा महिना पोथी पुराणात खूपच पवित्र मानला जातो.
त्यामुळे श्रावण महिण्यांत मोठ्या प्रमाणात व्रत वैकल्य केले जाते.व्रत वैकल्य म्हटले की मग उपवास आलाच.
जेव्हा उपवासाचा प्रश्न येतो तेव्हा लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की काय खाऊ शकतो आणि काय नाही?
या उपवासाच्या काळात तुम्ही जर का काही फळांचे सेवन केल्यास तुमचे पोटही भरेल आणि या फळांचा तुमच्या चेहऱ्यावर तेज निर्माण करतील. उपवासाच्या दिवशी फळे खाणे हे खूप फायद्याची असतात. कारण फळे ही पौष्टिकतेसोबतच, फायबरने सुध्दा समृद्ध असतात त्यामुळे तुमचे पोट भरते .
चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहेत ती 5 फळे
1) डाळिंब (Pomegranate)
डाळिंब हे अँटीऑक्सिडंट समृद्ध फळ आहे. यामध्ये आहारातील फायबर, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-के देखील भरपूर प्रमाणात असते. यामुळेच हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर मानले जाते.
2) सफरचंद (Apple)
रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना चार हात लांब ठेवा अशी एक म्हण चांगलीच प्रचलित आहेच. त्यामुळे सफरचंद आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सफरचंदामुळे आरोग्य तर उत्तम राहते सोबतच सफरचंदाचा तुमच्या त्वचेलाही फायदा होतो. सफरचंदामध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात, जे त्वचेला मुक्त रॅडिकल्स, यूव्ही किरण, प्रदूषण आणि त्वचेला हानी पोहोचवणाऱ्या इतर अनेक गोष्टींपासून होणाऱ्या वाचवतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी आणि दररोज एक सफरचंद नक्की खा.
3) केळी (Banana)
हे फळ प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण भरलेले फळ आहे. केळी खाल्याने आपल्या शरीराल झटपट ऊर्जा मिळते.त्यामुळे तुम्ही उपवासाच्या दिवशी केळी खाऊ शकता. दुसरीकडे, त्यात असलेल्या व्हिटॅमिन-बी6, व्हिटॅमिन-सी आणि पाण्याची टक्केवारी त्वचेला पोषण आणि हायड्रेट ठेवते. पाँडिचेरी जर्नल ऑफ नर्सिंगनुसार , हे घटक त्वचेचा पोत चांगल्या पद्धतीने राखतात. त्याच वेळी, त्यात उपस्थित अँटीऑक्सिडंट्स वृद्धत्व विरोधी म्हणून काम करतात.
4) आंबा (Mango)
सध्या आंब्यांचा सिजन गेला असला तरी बाजारात सध्या बदामी आंबे उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही उपवासाच्या दिवशी आंबे खाऊ शकता. आंब्यात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम, मिनरल्स यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. हे फळ शरीरासाठी तर चांगलेच आहे, पण त्याचबरोबर हे फळ त्वचा तरुण ठेवण्यासही मदत करते. कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात ज्या महिलांनी 16 आठवडे 85 ग्रॅम आंबा खाल्ला त्यांच्या चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत झाली आहे.
5) पपई (Papaya)
पपईमध्ये जीवनसत्त्वे ए, बी, सी, लाइकोपीन, प्रोटीओलाइटिक एन्झाईम्स जसे की पॅपेन आणि काइमोपेन असतात. पावसाळ्यात जरा थंडी सुध्दा पडते त्यामुळे उब येण्यासाठी तुम्ही पपई खाऊ शकता.पपई मध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीफंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आहेत. यामुळेच हे फळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही उत्तम मानले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.