आयुर्वेद हे केवळ आरोग्यशास्त्र नाही तर जीवन सर्वार्थाने कसे जगावे हे सांगणारे शास्त्र आहे. त्यामुळेच निरोगी व्यक्ती कोणास म्हणावे हे सांगताना त्यात ‘प्रसन्नात्मेंद्रिय मनः’ याचा उल्लेख केलेला आहे. .अर्थातच शरीराच्या बरोबरीने इंद्रियांना, मनाला व आत्म्याला सुद्धा आरोग्य प्राप्त होण्याकडे लक्ष देणे इष्ट असते आणि त्या दृष्टीने मनोरंजन अर्थात नाटक, सिनेमा, कला, संगीत, खेळ यांचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व लगेच लक्षात येते. गणेशोत्सवात मनाच्या रंजनाला स्थान दिलेले आढळते ते याचमुळे.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मनाच्या रंजनाची गरज असते. मुलाने फक्त अभ्यास करून विद्यार्थीदशेचे व ब्रह्मचर्याश्रमाचे सार्थक करावे हे जरी खरे असले आणि त्याने अभ्यास करून मिळवलेल्या पदवीचा भविष्यात नोकरी मिळवण्यासाठी जरी उपयोग झाला तरी बरोबरीने जर त्याला आतून येणारा आवाज ऐकण्याचे, निसर्गाची जवळीक साधण्याचे, .सर्वांभूती परमेश्र्वर पाहण्याचे, सर्वांवर प्रेम करण्याचे शिक्षण मिळाले नाही तर तो पृथ्वीच्या पाठीवर जन्माला आला व गेला, फार फार तर भला मोठा बँक बॅलन्स, एक घर, एक वाडा, एक महाल ठेवून गेला, असे व्हायचीच शक्यता असते. तेव्हा खेळ किंवा कला क्षेत्राकडे मुलाची आवड, प्रवृत्ती व प्रकृती असेल तर त्याला त्या विषयाचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन देणे हे सुद्धा आवश्यक होय.गाणे, कला वगैरे श्रीमंतांचेच विषय आहेत असेही बऱ्याच वेळा समजले जाते, पण थोडक्या भांडवलातून सुंदर कला निर्माण करणारेही कलाकार कमी नसतात. नाटक, सिनेमा पाहून मुले बिघडतात अशीही तक्रार बऱ्याच वेळा पुढे येते. मला तर असे वाटते की बिघडणारे बिघडतच राहतात, ठपका निष्कारणच कुठल्या तरी कारणावर ठेवला जातो..वास्तविक पाहता मनाच्या योग्य रंजनामुळे कौटुंबिक वा आर्थिक ताण सहन करण्याची शक्ती मिळून आयुष्य सुसह्य व सुकर होते. मंगलमूर्ती या देवतेचे स्वरूपच रंजक आहे. प्रत्येकाच्या मनात आनंद व भक्तिभाव उत्पन्न होतील असेच या देवतेचे स्वरूप आहे. साक्षात नटेश्र्वरांचे पुत्र असणारे आणि चार-चौघांना म्हणजे गणांना एकत्र आणून त्यांचे आधिपत्त्य करणारे ते ‘गणपती’! आणि सर्व गण एकत्र आल्यानंतर त्या सर्वांना एकाच वेळी मनाला शांती व आनंद देईल अशा एकमेव साधनरूपी संगीत, नाटक, नृत्य, कला, खेळ यांना प्रोत्साहन देणारे तेही गणपतीच. जरी अगदी मोठा कार्यक्रम योजला नाही तरी मंगलमूर्तींच्या उत्सवात दहा दिवस घराघरात संगीतमय आरत्या म्हणून मनरंजन करण्याचा कार्यक्रम असतोच. अधिक लोकांना या मनरंजनाच्या कार्यक्रमात भाग घेता येण्याच्या दृष्टीने सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणी रंजनाचे कार्यक्रम केले जातात..लोकमान्य टिळकांचा सार्वजनिक गणेशस्थापनेमागचा उद्देश हा एकूण सर्व समाजाचे प्रज्ञाजागरण, रंजन व्हावे व त्या निमित्ताने सर्वांना एकत्र आणून सामाजिक प्रबोधन व एकता तयार व्हावी हाच होता.सध्या मात्र पुन्हा एकदा मनाच्या रंजनाचे आरोग्याच्या व्याप्तीत बसणारे स्वरूप सर्वांनी लक्षात घेण्याची गरज तयार झालेली आहे. प्रत्येक भारतीय उत्सवामध्ये जर आरोग्याचा विचार होत असला तर तो या सार्वजनिक गणेशोत्सवात दुर्लक्षित होऊन कसा चालेल? तेव्हा एकतर मनोरंजन हे आरोग्यरंजन सुद्धा कसे होईल याचा विचार व्हायला हवा. त्यासाठी यात आरोग्यासाठी बोधप्रद मार्गदर्शन हवे, जीवनाच्या इतर अंगांसाठी मार्गदर्शन हवे, आरोग्यासाठी मदत करणाऱ्या अभिजात संगीताचे व स्वास्थ्यसंगीताचे कार्यक्रम हवेत..औषधे वगैरे न मारल्यास किंवा स्वच्छता न बाळगल्यास साथ पसरायला वेळ लागत नाही तसेच समाजातील विकृती वेळच्या वेळी थांबवल्या नाहीत तर भयानक रूप धारण करू शकतात. विकृती पसरत असताना गावाच्या भोवती पिठाची रेघ ओढून साथीला रोखू शकणारी साईबाबांसारखी विभूती एखादीच असते. सध्या मात्र भलते संगीत व भलते कार्यक्रम आरोग्यरंजनाला ग्रहण लावू पाहत आहेत. शेजारच्या गल्लीतल्या मंडळाच्या स्पीकरपेक्षा माझ्या मंडळाचा स्पीकर व आवाज मोठा असावा ही स्पर्धा निरोगी नाही. याचा आरोग्यरंजनासाठी काही उपयोग नाही. संगीत ऐकावे अशी इच्छा असल्यासच कानावर पडलेले संगीत उपयोगी पडते. बाजूच्या स्पीकरवरचे संगीत वा वक्त्याचे भाषण कर्णकर्कश असल्याने खिडक्या बंद करून, कानात कापसाचे बोळे घालून बसायची वेळ येत असल्यास त्या संगीताचा वा भाषणाचा उपयोग शून्य असतो, इतकेच नव्हे तर त्यापासून त्रासच होत असतो. या प्रकारच्या विकृती टाळून गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘आरोग्यरंजना’ला जर सर्वांनी समजून घेतले तर सर्वांनाच फायदा होईल.खरे तर संगीत हे एक फार मोठे आणि प्रभावी शास्त्र आहे. विशिष्ट रागात व विशिष्ट प्रकारे गाण्याने वात-पित्त-कफ प्रकृतीवर परिणाम घडवण्याची क्षमता भारतीय राग-रागिण्यात आहे. या राग-रागिण्या मनावर परिणाम करून मनाला संतोष, रंजन व समाधान देऊन आत्म्यापर्यंत आनंद पोचवू शकतात, हे विज्ञानानेही सिद्ध झालेले आहे. .भारतीय पारंपरिक गंधर्ववेद, सामवेद वगैरेंनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे शब्द व संगीत यांची योग्य जोड घातल्यास शरीरातील कुठलेही बाह्य किंवा आंतरेंद्रिय आरोग्यवान होऊन मनाला इंद्रियांवर ताबा ठेवणे सोपे होऊन आत्म्यापर्यंत पोचता येते. या सर्वांच्या संशोधनावरून व अनुभवावरून ‘स्वास्थ्यसंगीत’ हा आरोग्यरंजनाचा महत्त्वाचा मार्ग सिद्ध झाला आहे व अनेकांना याचा उपयोग होऊ शकतो. नाट्य हे तर दृक्-श्राव्याचे प्रभावी माध्यम आहे म्हणूनच टीव्ही व चित्रपट जगभरातल्या सर्वांचा आवडता विषय आहे. एखादी योग्य कल्पना जर सिनेमामध्ये मांडली तर मनरंजनाबरोबर लोकशिक्षण व प्रबोधनही होऊ शकते.गणेशोत्सवाच्या निमित्ताने आरोग्यरंजनाचा भरपूर वापर करून व्यक्तींचे पर्यायाने समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयोग होऊ शकतो हे लक्षात घ्यायला हवे. वास्तविक कुठल्याही उत्सवाचे संयोजन मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले होण्यासाठीच केलेले असते. तेव्हा गणेशोत्सवात या उद्देशाला म्हणजेच आरोग्याला बाधा येईल असे झाले नाही तरच श्रीमंगलमूर्ती मनुष्यमात्राला पावले असे म्हणता येईल आणि असे व्हावे हीच श्रीगणेशांच्या चरणी प्रार्थना !(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.