Ganesh Chaturthi 2023: सांगली जिल्ह्यात आहे गणपतीपुळ्याचे दुसरे स्थान, रथोत्सवाचे दक्षिण भारताशी आहे खास कनेक्शन

तासगावात आल्यानंतर पटवर्धन सरकारांना झाला दुष्टांत, वाचा यामागील आख्यायिका
Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023esakal
Updated on

Ganesh Chaturthi 2023: गणेशभक्‍तांचे श्रद्धास्थान असलेल्या तासगावातील रथोत्सवाला एक ऐतिहासिक परंपरा आहे. एक दोन नव्हे तर तब्बल २४४ वर्ष येथे गणेशाचा रथोत्सव सोहळा पार पडत आहे. तासवागालीत उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाच्या दरवर्षी रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होता.

तासगावातील या मंदिरात उजव्या सोंडेचा गणपती बाप्पा विराजमान आहे. या प्रसिध्द गणेश मंदिरापासून रथोत्सवाला हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतो. श्रीमंत राजेंद्र पटवर्धन यांच्या हस्ते पूजन होऊन रथोत्सवाला सुरूवात होते.

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023 : रोहित-विराटसह 'या' खेळाडूंच्या घरी बाप्पाचे आगमन, फोटो अन् व्हिडिओ व्हायरल… पाहा झलक

कधी झाली मंदिराची स्थापना

तासगावच्या उजव्या सोंडेचा गणपती म्हणजे श्री सिद्धीविनायकाची प्रतिषस्थापना मराठा साम्राज्याचे शेवटचे सेनापती श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी इ. स. १७७९ मध्ये केली.

कसा पार पडतो रथोत्सव

हा रथ भक्त आपल्या हातानी ओढून नेतात. रथामध्ये पंचधातूंची पचवीस किलो वजनाची श्रींची मूर्ती ठेवलेली असते. गणपती मंदिरापासून समोर असलेल्या श्री काशीविश्वेश्वर मंदिरापर्यंत हा रथ ओढला जातो. बाप्पा आपल्या वडिलांच्या भेटीला जातात असे मानले जाते. रथामध्ये पटवर्धन घराण्यातील श्रीमंत राजेंद्र पटवर्धन यांच्या समवेत विविध जातीचे मानकरी बसलेले असतात. तेथे आरती करून पुन्हा रथयात्रा माघारी फिरते.

दक्षिण भारतीय रथा

गणपतीची प्रतिष्ठापना करत असताना श्रींचे भाविकांशी असलेले नाते केवळ धार्मिक न रहाता, भक्त आणि श्री यांच्यातील अंतर कमी व्हावे या हेतूने दक्षिण भारतातील रथयात्रेची कल्पना परशुरामभाऊ पटवर्धन यांनी सुरू केली. दरवर्षी ऋषी पंचमीला तीन मजली लोखंडी सांगाडा असलेला आणि त्यावर लाकडी कोरीवकाम केलेला असा रथ भक्त आनंदाने ओढून नेतात. (Sangli)

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023: जात धर्माच्या पलीकडे सलमान शाहरुखचं सेलिब्रेशन! थाटामाटात केलं गणरायाचं स्वागत..

या मंदिराची आख्यायिका अशी आहे की, परशुरामभाऊ हे गणपतीपुळे येथील गणपतीचे भक्‍त होते. ते पुळ्याच्या गणपतीचे दर्शन घेऊन मोहिमेवर निघत. तासगाव येथे स्थायिक झाल्यानंतर भाऊना दृष्टांत झाल्याने तासगावात श्रींची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याप्रमाणे मंदिराचे बांधकाम सुरू केले. युद्ध मोहिमांमुळे दाक्षिणात्य मंदिर स्थापत्य त्यांच्या नजरेत भरले होते. (Ganesh Chaturthi 2023)

पुण्याच्या पर्वतीवरील देवदेवेश्‍वर मंदिराचे शंकर पंचायतन त्यांना नेहमी आकृष्ट करीत होते. त्यामुळे त्यापद्धतीचे बांधकाम तासगावच्या गणपतीमंदिराचे करण्यात आले आहे. बांधकामासाठी कर्नाटक, राजस्थानातील ज्ञात, अज्ञात गवंडी, चित्रकार यांच्या परिश्रमातून श्रीसिद्धिविनायक मंदिर सन १७७९ मध्ये पूर्ण झाले. त्याचवर्षी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात आली. 

गावकऱ्यांनी आजही ही परंपरा जपली आहे. सांगलीच्या तासगाचा रथोत्सव, तिथे भक्तांची होणार गर्दी आजही कायम आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.