Ganesh Chaturthi 2023: बाप्पांसमोर राशींनुसार करा या मंत्रांचा जप, अडचणींच्या फेऱ्यातून होईल सुटका

अशा वातावरणात जर काही मंत्रांचा जप केला तर अनेक समस्या दूर होतात
Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023esakal
Updated on

Ganesh Chaturthi 2023: हिंदू धर्मात गणेश चतुर्थी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेश उत्सव वर्षातील भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून सुरू होतो. हा उत्सव 10 दिवस चालतो. या 10 दिवसांमध्ये लोक घरोघरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करतात. बाप्पांची पूजा आणि विधीपूर्वक सेवा करतात. यंदाचा गणेशोत्सवाला कालपासून सुरूवात झाली आहे.

धार्मिक मान्यतेनुसार कोणतेही शुभ किंवा शुभ कार्य करण्यापूर्वी श्रीगणेशाचे स्मरण केले जाते. सर्व विघ्नांपासून मुक्ती मिळावी यासाठी गणपती बाप्पाचे स्मरण केले जाते असे म्हटले जाते. गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा स्थितीत 10 दिवस विधीनुसार गणपतीची आराधना करावी.

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Festival 2023 : 'चप्पल घालून कोण पूजा करतं का फराह'? कोरिओग्राफरनं दिले सणसणीत उत्तर

तसेच ज्योतिष शास्त्रानुसार बाप्पांच्या मूर्तीसमोर राशीनुसार काही मंत्रांचा जप केला असता. त्यामुळे सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. चला तर मग जाणून घेऊया राशीनुसार गणपती बाप्पाच्या मंत्रांचा जप कसा करायचा.

अयोध्येचे ज्योतिषी नीरज भारद्वाज यांनी सांगितले की, गणेश उत्सवात भगवान गणेशाची पूजा विधीपूर्वक केली जाते. बाप्पा सर्वांचे सुखकारक करण्यासाठी आपल्या घरी येत असतो. बाप्पांच्या घरी असण्यामुळे वातावरण शुद्ध आणि पवित्र होते. अशा वातावरणात जर काही मंत्रांचा जप केला तर तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात.

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023: सांगली जिल्ह्यात आहे गणपतीपुळ्याचे दुसरे स्थान, रथोत्सवाचे दक्षिण भारताशी आहे खास कनेक्शन

जर एखाद्या व्यक्तीने गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या मित्रांसाठी त्याच्या राशीनुसार नामजप केला. त्यामुळे त्यांना सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. (Astrology)

  • मेष रास - मेष राशीच्या लोकांनी ‘ओम वक्रतुण्डाय हूं’ या मंत्राचा जाप करावा.

  • वृषभ रास: वृषभ राशीचे लोक ‘ओम हीं ग्रीं हीं’ हा मंत्र म्हणू शकतात.

  • मिथुन रास : मिथुन राशीच्या लोकांनी संकट निवारणासाठी ‘ओम गं गणपतये नमः’ किंवा ‘श्रीगणेशाय नम:’ मंत्राचा जप करावा.

  • कर्क रास: या लोकांनी ‘ओम वक्रतुण्डाय हूं’ किंवा ‘ओम वरदाय नम:’ याचा जप करावा.

  • सिंह रास – सिंह राशीच्य लोकांनी ‘ओम सुमंगलाये नम:’ चा जप करावा.

  • कन्या रास: कन्येच्या लोकांनी ‘ओम चिंतामण्ये नम:’ मंत्र का जप करावा.

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023 : या वर्षी ज्येष्ठा गौरी आवाहन कधी आहे? जाणून घ्या
  • तुळ रास : तुला राशि के जातकों को ‘ओम वक्रतुण्डाय नम: मंत्र का जाप करना चाहिए.

  • वृश्चिक रास : वृश्चिक राशिच्या लोकांनी ‘ओम नमो भगवते गजाननाय’चा जप करावा.

  • धनु रास : धनुच्या लोकांनी ‘ओम गं गणपते मंत्र’ म्हणावा.

  • मकर : मकर राशीसाठी ‘ओम गं नम:’ हा मंत्र लाभदायी ठरेल.

  • कुंभ रास : कुंभ राशिच्या लोकांनी हा जप करावा ‘ओम गण मुक्तये फट्’

  • मीन रास: मीन राशिच्या लोकांनी ‘ओम गं गणपतये नमः’ किंवा ‘ओम अंतरिक्षाय स्वाहा’ चा जप करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.