Angaraki Sankashti Chaturthi 2024: देशातलं असं मंदिर जिथे होते गणेशाची मूळ रूपात पूजा, मंदिरही आहे खास,जाणून घ्या

या मंदिरात पितरांची शांतीही केली जाते
Angaraki Sankashti Chaturthi 2024
Angaraki Sankashti Chaturthi 2024esakal
Updated on

Angaraki Sankashti Chaturthi 2024 :

गणपती देवांचं नावं घेतलं की आपल्या हत्तीची सोंड असलेला, टुकुमुकु डोळ्यांनी बघणारा बाप्पा नजरेसमोर येतो. बाप्पाला सोंड आहे तसेच त्याचा एक दात तुटलेला आहे, त्याच्या या रूपावरून अनेक गाणीही बनवण्यात आली आहे. बाप्पाच्या चेहरा पाहिला की समाधान वाटतं. तसंच आज तुम्हाला घरातला बाप्पा पाहुन वाटत असेल.

तर, गणेशाची अनेक रूपात पूजा केली जाते. कुठे बाळकृष्ण असतो, तर कुठे भगवान शंकरांच्या रूपातील. एवढेच काय तर खाकी वर्दीतही बाप्पा असतो. गेल्यावर्षीच्या गणेशोत्सवात पोलिस बाप्पा गाजला होता. या प्रत्येक स्वरूपात बाप्पाचा चेहरा एकाच प्रकारचा असतो.

आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशा एका गणेशाची माहिती देणार आहोत ज्याचा चेहरा मानवी चेहऱ्याप्रमाणेच आहे. होय, भारतातच हे मंदिर असून त्याची माहिती आपण घेऊयात.

Angaraki Sankashti Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2023: 'आई कुठे काय करते'च्या सेटवर गणरायाचं आगमन! 'चांद्रयान 3' चा देखावा करत कलाकारांनी दिली मानवंदना

तमिळनाडूच्या तिरुवरूर जिल्ह्यात असलेले आदि विनायक हे मंदिर जरा खास आहे. याठिकाणी असलेली गणेशाची मूर्ती वेगळी आहे. येथे असलेल्या गणपतीच्या मूर्तीला सोंड नाही. म्हणूनच गणपतीचे हे नवे रूप पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक या मंदिरात येतात.

या मंदिराची रचना कधी झाली याबद्दल फारशी माहिती नाही. परंतू, असे मानले जाते की हे मंदिर 7 व्या शतकात बांधले गेले होते. आणि ते तामिळनाडू राज्यातील सर्वात प्राचिन मंदिरांपैकी एक आहे.

Angaraki Sankashti Chaturthi 2024
Ganesh Chaturthi: 'विघ्नहर्ता' जनतेसमोरील सर्व अडथळे दूर करील, एकनाथ शिंदेंची गणेशाचरणी प्रार्थना!
गणेशाचे हे तामिळनाडू राज्यातील सर्वात प्राचिन मंदिर आहे
गणेशाचे हे तामिळनाडू राज्यातील सर्वात प्राचिन मंदिर आहेesakal

गणेशाला हत्तीचे मुख का बसवले गेले?

देवी पार्वतीने अंगाच्या मळापासून गणेशाची रचना केली. त्यानंतर तिने गणेशाला द्वारपाल म्हणून उभे केले. अनेक विनवण्या करूनही महादेवांना गणेशाने गृहप्रवेश करू दिला नाही. यामुळे रागाच्या भरात भगवान शंकरांनी गणेशाची मान धडापासून वेगळी केली होती. त्यानंतर, इतर देवतांच्या सूचनेनुसार, गणेशाला हत्तीचे धड जोडले गेले.

तेव्हापासून तुम्हाला प्रत्येक फोटोत आणि प्रत्येक मंदिरात गणपतीची तीच मूर्ती दिसेल. पण आदिविनायक मंदिरात असे नाही, येथे असे मानले जाते की श्रीगणेशाला हत्तीचे मुख देण्याआधी त्यांचा चेहरा मानवाचा होता, त्यामुळे येथे फक्त मानवी स्वरूपातील गणेशाच्या मूर्तीची पूजा केली जाते. (Ganesha)

Angaraki Sankashti Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2023 : देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह; पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिल्या शुभेच्छा!

मूर्तीचे वैशिष्ट्य काय?

तामिळनाडूच्या या अनोख्या आदिविनायक मंदिरात आढळणारी गणेशाची मूर्तीही अनोखी आहे. केवळ बाप्पाचा चेहरा वेगळा नाही. तर हा पुतळा ग्रॅनाइटचा वापर करून बनवण्यात आला आहे. गणपतीच्या एका हातात कुऱ्हाड आहे, तर दुसर्‍या हातात बाप्पाचा आवडता मोदक आहे.

या मंदिरात पितरांची शांतीही केली जाते

एकदा प्रभू रामाने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आदि विनायक मंदिरात पूजा केली होती. तेव्हापासून लोक या मंदिरात आपल्या पूर्वजांच्या शांतीची पूजा करण्यासाठी येतात. नदीच्या काठावर पूजा केली जाते. हे मंदिर दिसायला अगदी साधे असले तरी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. (Angaraki Sankashti Chaturthi )

Angaraki Sankashti Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2023: गणपतीच्या प्रसादात काय द्याल आणि काय नाही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.