Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पांनी महाभारत लिहीताना महर्षी वेदव्यासांसमोर कोणती अट ठेवली होती?

व्यास ऋषींना लिखाणासाठी बाप्पांनी होकार दिला. पण
Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023 esakal
Updated on

Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पांना बुद्धीचा अधिपती म्हणतात. तो विघ्नहर्ता असून सर्वांच भलं करणारा आहे. गणपतीला सर्वात हुशार मानले जाते. गणपतीला सर्वच देवी-देवतांमध्ये धैर्यवान आणि बुद्धिवान मानले जाते. तो सुखकर्ता आहे त्यामुळ कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात बाप्पाला वंदन करूनच होते.

सध्या जगभर गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. तसं तर आपण लहानपणापासून गणपती बाप्पांच्या अनेक गोष्टी ऐकत आलो आहोत. पण, तुम्हाला हे माहितीय का की महाभारत हे महाकाव्य गणपतीबाप्पांनी लिहीले होते. महर्षी व्यासांनी ते बाप्पांना सांगितले आणि बाप्पांनी ते लिहीले.

पण, ते लिहीण्यासाठी बाप्पांनी महर्षी व्यासांना एक अट घातली होती. ती अट कोणती आणि बाप्पाला अशी अट का घालावी लागली याची कथा काय आहे. हे आपण जाणून घेऊयात.

Ganesh Chaturthi 2023
Sakal Ganesha Workshop : चिमुकले हात साकारणार इवलेसे गणपती; ‘सकाळ एनआयई’ रोटरी मिडटाउनतर्फे रविवारी कार्यशाळा

जेव्हा महर्षी वेद व्यास महाभारत नावाचे महाकाव्य लिहिण्यास सुरुवात करणार होते. महाकाव्य लिहीण्यासाठी ते एका लेखकाच्या शोधात होते. जो महर्षींच्या कामात व्यत्यय आणणार नाही. असा हुशार आणि विद्वान देवता म्हणून गणेशांचे नाव डोळ्यांसमोर आले. तेव्हा गणेशांनाच व्यास ऋषींनी लेखक बनवले.

व्यास ऋषींना लिखाणासाठी बाप्पांनी होकार दिला. पण, हे लिखाण करताना बाप्पांनी ऋषींना अशी अट घातली की, संपूर्ण काव्य लिहून होईपर्यंत एक क्षणही विश्रांती घ्यायची नाही. तेव्हा ऋषींनीही होकार दिला आणि बाप्पांनी महाभारत लिहायला घेतलं.

अशा पद्धतीने दोन्ही विद्वान देवता आपापली भूमिका बजावू लागले. महर्षी व्यास अतिशय वेगाने बोलू लागले. त्याच वेगाने भगवान गणेश महाकाव्य लिहू लागले.

Ganesh Chaturthi 2023
Sakal Ganesha Competition : ‘सकाळ’तर्फे गणेशभक्तांसाठी ‘आम्ही अन् आमचे बाप्पा’ स्पर्धा; जाणून घ्या सविस्तर

त्यावेळी महर्षी व्यास म्हणाले की, देवा तुम्ही विद्वानांचे पण विद्वान आहात आणि मी सामान्य ऋषी , जर माझ्याकडू एखादा श्लोक चुकला तर तुम्ही तो कृपया दुरूस्त करून घ्या. अशा प्रकारे महाभारताचे लेखन सुरू झाले आणि सलग १० दिवस चालले.

अनंत चतुर्दशीला जेंव्हा महाभारत लेखनाचे काम पूर्ण झाले, तेंव्हा गणरायांचे शरीर जडवत झाले होते. अजिबात न हलल्याने त्यांच्या शरीरावर धूळ, माती जमा झालेली होती. तेंव्हा गणरायांनी सरस्वती नदीत जाऊन स्नान केले होते. म्हणून गणेशाची स्थापना १० दिवस होते व मग विसर्जन केले जाते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()