Ganesh Chaturthi 2024 : मैत्रिणींनो, घरही सांभाळा अन् आवडही जपा! गणेशोत्सवाच्या सिझनमध्ये हे छोटे बिझनेस करून कमवा पैसे

Ganesh Chaturthi Festival Buisness Idea For Womens : मैत्रिणींनो,तुम्ही घर मुलं सांभाळून अशा काही गोष्टी करू शकता. ज्या तुम्हाला आनंदही देऊ शकतात अन् तुम्हाला त्यातून पैसेही मिळतील.
Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2024esakal
Updated on

Ganesh Chaturthi Festival Buisness Idea For Womens :

गणपतीचा सण आठ दिवसांवरती आला आहे. गणपतीच्या साहित्याने बाजारपेठा नटल्या आहेत.  बाजारात अनेक प्रकारचे बापाच्या सजावटीचे साहित्य, बाप्पाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य विकले जात आहे. त्याच्या अनेक व्हरायटी पाहायला मिळत आहेत.

कुठलाही सण आला की बाजारपेठा सज्ज होतात. आणि हा सीझन व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतो. घराघरातही गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी केली जाते. बाप्पा आणि गौराईसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ बनवले जातात. त्यासाठी सजावट केली जाते. काही महिलांना कलात्मक गोष्टी करायला आवडतात. त्या महिला यंदाच्या गणेशोत्सवात व्यवसायाची नवी संधी उभारू शकतात.

Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थीला वाढवा तुमचाही रूबाब; तरूणांसाठी बेस्ट आहेत 'हे' आऊटफीट्स, दिसाल एकदम झक्कास..!

गणपती बाप्पा सर्वांच्याच घरी आनंद,सुख घेऊन येतात. तुमच्यावर असलेले आर्थिक संकट दूर करण्याचा मार्गही बाप्पा सुचवेल. तुम्ही घर मुलं सांभाळून अशा काही गोष्टी करू शकता. ज्या तुम्हाला आनंदही देऊ शकतात अन् तुम्हाला त्यातून पैसेही मिळतील. अशा कोणत्या गोष्टी आहेत हे जाणून घेऊयात. (Ganesh Chaturthi Festival Buisness Idea For Womens)

गणपतीची सजावट

जर तुम्हाला कलात्मक वस्तू बनवण्याची आवड असेल तर तुम्ही घरोघरी जाऊन गणपतीची आरास करून देऊ शकता. ग्राहकाची आवड लक्षात घेऊन तुम्ही त्या पद्धतीने सजावट करू शकता.

सजावटीसाठी लागणारे साहित्य तुम्ही स्वतःही नेऊ शकता किंवा ग्राहकाकडूनही मागवू शकता. त्यांना सांगू शकता. गणपतीची सजावट कशी आहे यावरून किती वेळात पूर्ण होईल हे ठरवू शकत ठरू शकता. तुम्ही ग्राहकाच्या घरी जाऊन ऑर्डर घेऊन हे काम करू शकता.

त्यामुळे तुम्ही आधी ऑर्डर घेऊन तुमचे घर, मुले सांभाळत हे काम करू शकता. गणपतीच्या आधी तुम्ही ग्राहकांच्या घरी जाऊन तिथे सजावट फिट करू शकता. याचे तुम्हाला चांगले पैसे मिळतील.

Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2023 : विसर्जन मिरवणुकीत हरवलेला फोन शोधणार गुगलचे हे फिचर, लगेच Download करा!

मोदक विक्री

गणपती बाप्पाला आवडणारे मोदक फक्त तांदळाचे आणि गव्हाचे उरलेले नाहीत. आत्ताच्या बापाला चॉकलेटचेही मोदक आवडतात. घरातील बालकांना आवडणारे चॉकलेटचा मोदक बाप्पासाठी सुद्धा आणले जातात. तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तुम्ही त्यात पारंगत असाल तर वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवून विकू शकता याने तुम्हाला मोठा फायदा होईल.

Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2023 : मनाचे रंजन करणारे गणराज!

सजावटीच्या वस्तूंची विक्री

तुमचं घर बाजारपेठेत असेल किंवा अगदी खेडेगावात तुम्ही एक व्यवसाय नक्की करू शकता. तो म्हणजे सजावटीचे साहित्य विक्रीचा. तुम्ही घरातले कामं सांभाळत हा व्यवसायाचा पर्याय नक्की स्वीकारू शकता.

यासाठी तुम्हाला होलसेल व्यापाऱ्यांकडून स्वस्तात सजावटीचे साहित्य उपलब्ध होईल. तसेच गौराईसाठी लागणारे दागिने साहित्य यांची सुद्धा विक्री तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्हाला नक्की फायदा होईल

Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2023: बाप्पासाठी बनवा पान गुलकंदाचे मोदक, ही आहे सोपी रेसिपी

गौराईला साडी नेसवणे

गणपती बाप्पांचे आगमन झाल्यानंतर दोन दिवसांनी गौराई येते. आजकल अनेक महिलांना गौराई आणायला आवडते पण तिचा श्रृंगार मनासारखा जमत नाही. तुम्ही या महिलांची मदत करून तुमचा फायदा करून घेऊ शकता.

आता तुम्ही ‘गौराईला साडी नेसवून देऊ’ देऊ शकतो अशी जाहिरात दिलेत तर तुम्हाला अनेक फोन येतील. तुम्ही संबंध ग्राहकांच्या घरी जाऊन गौराईला साडी नेसवून तिला दागिने घालून तयार करून एक चांगलं काम करू शकता.

Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2023: आजारपणाच कारण देत गणपतीसाठी गावाला जाणं पोलीस निरीक्षकास पडलं महागात; आयुक्तांनी केलं निलंबित

रांगोळी काढणे

हा व्यवसाय अनेक दिवसांपासून सुरू आहे. अनेक प्रोफेशनल रांगोळी आर्टिस्ट आहेत. पण तुम्ही सार्वजनिक मंडळे, मिरवणुका, गौरी गणपती समोर रांगोळी काढू शकता. आणि त्याचे तुम्हाला पैसे सुद्धा मिळतील.

हार-गजरे

गणपतीच्या दिवसात हार, फुलांच्या माळा, गजरे यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. तुम्हाला फुलांचे हार, तोरण, गजरे, वेगळ्या फुलांचे अंबाडे, वेणी बनवता येत असेल तर तुम्ही गौरी गणपतीसाठी आणि गृहिणींसाठी ते बनवू शकता. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

Ganesh Chaturthi 2024
Nashik Ganesh Utsav 2024: गौरी गणपतीची बाजारपेठ एकाच छताखाली; उद्योगिनी प्रतिष्ठान, ‘स्वावलंबी भारत’ चा उपक्रम

 

गौराईसाठीचा नैवेद्य

गौराई येते त्या दिवशी भाजी-भाकरीचा आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य तिला लागतो. आणि प्रत्येक घरात पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. तुम्हाला पुरणपोळ्या चांगल्या बनवता येत असतील तर तुम्ही त्या बनवण्याची ऑर्डर घेऊ शकता.  

पारंपारिक पद्धतीच्या तेलाच्या पुरणपोळ्या बनवणे सध्या फार महिलांना जमत नाहीत. त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय नक्कीच करू शकता. तसेच, महाराष्ट्रातील काही भागात गौराईसोबत गंगाही असते. जिथे गंगा-गौर असते तिथे दिवाळीत बनवले जाणारे फराळाचे सर्व पदार्थ बनवले जातात. त्यामुळे गणपतीतही अशा पदार्थांची मागणी असते. तुम्ही अशा पदार्थांची पाकिटे बनवून विकू शकता.

Ganesh Chaturthi 2024
Kashmir Ganesh Festival : काश्‍मीरमधील गणेशभक्तीने मुख्यमंत्री भारावले

जाहीरातीची काळजी करू नका

तुम्ही कुठलीही गोष्ट केली की सोशल मिडियावर पोस्ट करता. लोक तुमचं कौतुक करतात. हे सोशल मिडियाच तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी मदत करेल. तुम्ही करणार असलेला कोणताही व्यवसायाची जाहीरात स्टेटसला ठेवा. सजावटीच्या साहित्याची, बनवलेल्या मोदकाची, गरजे  अन् फुलांची, तसेच, गौराईला नेसवलेल्या साडीचीही जाहीरात यावर ठेवा. तुम्हाला तुमच्या ओळखीच्या लोकांचा नक्कीच प्रतिसाद मिळेल. (Ganesh Chaturthi Festival Buisness Idea)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.