डॉ. प्रणिता अशोक
Ganesha Chaturthi 2024: गणेशोत्सव हा मांगल्याचा, चैतन्याचा सण. आपले धार्मिक सण, प्रथा-परंपरा या प्रत्येकाला शास्त्रीय संदर्भ आहेत. तसेच या सणांमध्ये केल्या जाणाऱ्या नैवेद्य, प्रसाद यालाही आहारशास्त्राच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व असते. त्यामुळेच त्या-त्या सणाला, उत्सवाला केले जाणारे पदार्थ वेगवेगळे असतात. लाडक्या बाप्पाचे आगमन झाले की, जसे सांस्कृतिक कार्यक्रम, सजावट असा धूमधडाका असतो, तसेच गणरायाला प्रसाद काय याकडेही तेवढ्याच कटाक्षाने पाहिले जाते.