Celebrating Ganesh Chaturthi With Fashion :
लग्न समारंभ आणि फेस्टिव सीजनमध्ये महिला-तरुणींच्या फॅशन बद्दल सर्वच लोक चर्चा करतात. मुलींच्या फॅशन फ्रेंडमध्ये नवी व्हरायटी काय आली आहे याची चर्चा होते. पण पुरुषांना यातून बाजूला ठेवल जातं. कारण, पुरुषांचे फॅशन वर्षानुवर्षी तीच आहे. त्यांच्यामध्ये अधिक व्हरायटी पाहायला मिळत नाहीत
महिला साडी, ड्रेस, घागरा चोली, लेहंगा असा कुठलाही पॅटर्न घालू शकतात. पण पुरुष मात्र धोती कुर्ता किंवा शर्ट आणि पॅन्ट यावरच फोकस करतात. त्यामुळे गणपती बाप्पाच्या सणात तुमचाही आनंद द्विगुणीत करायचा असेल तर हे फॅशन ट्रेंड नक्की चेक करा. (Mens Fashion)
यंदाच्या गणेशोत्सवाला तुम्हीही काही वेगळं हटके ट्राय करून इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण आज आम्ही तुम्हाला गणेशोत्सवात ट्राय करता येतील असे काही मेन्स फॅशन ट्रेंड सांगणार आहोत. जे तुमची शोभा वाढवतील आणि तुमचा रुबाब कायम ठेवतील.
तुम्ही शर्ट पॅन्ट घालणार असाल तर त्याला बेस्ट पर्याय कुर्ता पायजमा ठरू शकतो. कारण कुर्ता आणि पायजमा आपल्याला पारंपरिक लूक देतो. कुर्त्यांमध्ये अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही गणेशोत्सवाला पारंपरिक रंगात रंगून बाप्पाचे स्वागत करा.
तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कुर्त्याला थोडा हटके लूक द्यायचा विचार करत असाल. तर तुम्ही जॅकेट नक्की ट्राय करावे. तुम्ही कुठल्याही कुर्त्यावरती बंडी जॅकेट ट्राय करू शकता. यामुळे तुम्हाला एक रिच लूक येईल.
तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ते ट्राय केले असतील तर तुमच्याकडे फ्लोरल प्रिंट कुर्ता असायलाच हवा. गणेशोत्सवासारख्या उत्साहाने भरलेल्या सणामध्ये तुम्ही फ्लोरल प्रिंट कुर्ता घातला तर तो तुम्हाला एक स्टायलिश लुक देतो. कोणत्याही रंगाच्या फ्लोरल प्रिंट कुर्त्यावरती जर तुम्ही प्लेन पांढऱ्या रंगाचा पायजमा घातलात तर तुम्हाला रॉयल लुक मिळेल.