Ganesh Chaturthi : गणपती बाप्पा घरी आहेत तोवर राशीनुसार करा हे उपाय; संकटांचा फेऱ्यातून सुटका होईल!

गणेशोत्सव काळात तुम्ही तुमच्या राशीनुसार काही उपाय केल्याने तुमच्या मागे लागलेल्या साडेसातीचा प्रभाव कमी होईल.
Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthiesakal
Updated on

Ganesh Chaturthi Astrology Upay :

घरोघरी गणपती बाप्पांचे जल्लोषात आगमण झाले आहे. गल्लो-गल्ली बाप्पांची आरती, सजावट, धूप-उदाचा सुवास सुटला असेल. गणपती बाप्पांसाठी खास पदार्थ बनवले असतील. काहींच्या घरी दिड दिवस, तर काहींच्या घरी ५ दिवसांचाही गणपती असतो.  

गणपती बाप्पा घरी आले की घरातील वातावरण प्रसन्न असतं. सर्व संकटे, चिंता आपण विसरून जातो. कारण, बाप्पा आपलं सर्व दु:ख दूर करणारा आहे. गणेशोत्सव काळात तुम्ही तुमच्या राशीनुसार काही उपाय केल्याने तुमच्या मागे लागलेल्या साडेसातीचा प्रभाव कमी होईल. अनेक दिवस अडकलेली कामे पूर्णत्वास जातील, असं ज्योतिष शास्त्रात सांगितलं आहे.  

Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi 2024 : मोदकांच्या किमतीत 20 रुपयांनी वाढ; बाजारपेठेत निरनिराळे प्रकार उपलब्ध

मेष रास

गणेश चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्ती सोबत एका सुपारीचे हे पूजन करा. गणपती बाप्पांच्या सहवासात त्या सुपारीला ठेवा. आणि नंतर एका कापडात बांधून ती सुपारी तिजोरी ठेवा. यामुळे तुमच्या तिजोरीत कधीच पैशांची कमतरता भासणार नाही.

वृषभ रास

भूषण राज्याच्या लोकांनी गणेश चतुर्थी दिवशी चार नारळाचे तोरण गणेश मंदिरात अर्पण करावे. यामुळे तुमच्या कामात येणाऱ्या अडचणी आणि अडथळे दूर होतात.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थी दिवशी गणेश संकटनाशक स्त्रोताचे जॉब करावा. यामुळे विवाह जेवणातील समस्या दूर होतात.

 

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थी दिवशी बाप्पाची पूजा करावी आणि गणेशाला पंचमेवाचा नैवेद्य दाखवा. ज्योतिष शास्त्रात अशी मान्यता आहे की, या उपायाने गृहदोष नाही होतात.

Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi 2024 : मोदकांच्या किमतीत 20 रुपयांनी वाढ; बाजारपेठेत निरनिराळे प्रकार उपलब्ध

सिंह रास

मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होऊन त्यांना यश मिळावं यासाठी गणपती बाप्पांना कुंकू अर्पण करावे आणि गणेश चालीसा वाचन करावे.

 

कन्या रास

कन्या राशी असलेल्या व्यक्तींनी गायीची सेवा करावी. गाय अन् गणपती बाप्पांचे वाहन उंदीरमामा यांना खाऊ घालावे. त्यामुळे तुमच्यावर बाप्पाची कृपा होईल.

 

Ganesh Chaturthi
Pune Ganesh Festival: बाप्पाची मूर्ती घरी कधीपर्यंत करता येणार विराजमान? 5 मानाच्या गणपतींच्या प्राण प्रतिष्ठेची वेळ कधी? जाणून घ्या

तूळ रास

काहीवेळा सण-समारंभातही घरोघरी वाद सुरू असतात. त्यामुळे घरातील वातावरण गढूळ होते. जर तुम्हीही अशा वातावरणातून जात असाल तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत 'ॐ ह्रीं ग्रीं ह्रीं' या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा.

 

वृश्चिक रास

सध्या प्रत्येकालाच कधी ना कधी पैशांची कमी भासते. अशावेळी, गणेश चतुर्थीदिवशी मातीपासून बनलेल्या गणेशाची स्थापना करा. त्यांची दररोज आरती करा अन् नैवेद्यही दाखवा. यामुळे आर्थिक अडथळे दूर होतात, असे सांगितले जाते.

धनु रास

नोकरी आणि व्यवसायात अपशय येत असेल तर गणेश चतुर्थीदिवशी घरात पिवळ्या रंगाच्या गणेशाची मूर्ती स्थापन करा. किंवा ऑफिस अन् दुकानात पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेली मूर्ती आणा.

 

मकर रास

गणेश चतुर्थी दिवशी ११ दुर्वांच्या जुड्यांचा हार बनवून गणपती बाप्पाला घाला. दूर्वा घालताना ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा जप करा, याने तुम्हाला येणाऱ्या अडचणी दूर होतील. .

Ganesh Chaturthi
Rakhi According To Zodiac: भावाच्या जीवनात सतत येतायेत संकटे, राशीनुसार मनगटावर बांधा पवित्र राखी, नक्की फरक पडेल

कुंभ रास 

गणेश चतुर्थीदिवशी बाप्पाचे पूजन करून तूप अन् गुळ गायीला खायला घालावा. तसेच, गरजू व्यक्तीला दान करा. त्यामुळे ग्रहदोष दूर होतात.

 

मीन रास

घरात शांतता रहावी, मुलांची प्रगती व्हावी यासाठी घरी गणेश यंत्र आणा. गणेश यंत्राचा प्रभाव घरात पडतो अन् आपली अनेक कामे सहज सोपी होतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.