जाणून घ्या, गटारी अमावस्या साजरी करण्याची वेळ

गटारी सुरु होण्याची वेळ व समाप्तीची वेळ ठाऊक आहे का?
Food lovers are going miss nonveg food as festivals are banned
Food lovers are going miss nonveg food as festivals are banned
Updated on

सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून श्रावण महिना सुरु होत आहे. व्रतवैकल्याचा महिना अशीही या महिन्याची ओळख आहे. त्यामुळे एकदा श्रावण महिना सुरु झाला की पुढील काही दिवस मांसाहार करता येत नाही. श्रावण संपला की लगेच गणपतीचे वेध लागतात. त्यामुळे साधारणपणे दीड महिन्यानंतरच नॉनव्हेज लव्हर्सला मांसाहार करण्याची संधी मिळते. परंतु, श्रावण महिन्यात नॉनव्हेज न खाणारे हा महिना सुरु होण्यापूर्वीच नॉनव्हेजची पार्टी करतात. यालाच आजकालच्या भाषेत गटारी असं म्हटलं जातं. आज तिच गटारी म्हणजेच गटारी अमावस्या आहे. मात्र, या अमावस्येलाही मुहूर्त आणि समाप्ती असते. त्यामुळे गटारी अमावस्येचा मुहूर्त कोणता ते पाहुयात. (gatari-amavasya-2021-date-and-significance-ssj93)

आषाढी अमावस्येला गटारी अमावस्या असं म्हटलं जातं. मुळात हे फार कमी जणांना माहित असेल. तर यंदा आषाढी अमावस्या आज ८ ऑगस्टला आहे. त्यामुळे या सुट्टीच्या दिवशी नॉनव्हेज लव्हर गटारी साजरी करु शकतात.

Food lovers are going miss nonveg food as festivals are banned
Recipe: गटारी स्पेशल! नक्की ट्राय करा 'हिरवं चिकन'

दरम्यान, आषाढी अमावस्या दीप अमावस्या म्हणूनही साजरी केली जाते. या दिवशी घरातील सगळे दिवे स्वच्छ धुवून पुसून त्यांची पूजा केली जाते. त्यामुळे अनेक जण याच दिवसापासून श्रावण पाळू लागतात. आषाढी अमावस्या शनिवारी,७ ऑगस्टला संध्याकाळी ७.११ मिनिटांनी सुरु होणार असून ८ ऑगस्टला संध्याकाळी ७.१९ ला संपणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.