Gauri Ganpati 2023 : कुठे सुगडाच्या तर कुठे मुखवट्याच्या असतात गौराई, विशेष आहे तिचे महत्त्व

विदर्भात ती महालक्ष्मी म्हणून बहिणीसोबत येते
Gauri Ganpati 2023
Gauri Ganpati 2023esakal
Updated on

Gauri Ganpati 2023 : सोन्याच्या पावलांनी गवर आली म्हायराला, असं म्हणतं आज दिवसभर गौराईचे आगमन होत आहे. गौराईच्या आगमनाचा मुहूर्त पहाटेपासून दुपारी १.३० पर्यंतचा आहे. त्यामुळे अनेक घरात गौरांईंना घरात घेण्याची घाई सुरू आहे.

गणपती बाप्पा घरी विराजमान झाले की, पाठोपाठ गौराई शंकरोबा, गंगा गौरीचे घरी आगमन होते. पश्चिम महाराष्ट्रात गौराई पती शंकर महादेवांसोबत येते. तर विदर्भात ती महालक्ष्मी म्हणून बहिणीसोबत येते. राज्यभरात गौराईंचे महत्त्व आणि त्या उभ्या करण्याच्या परंपरा काय आहेत हे पाहुयात.  (Gouri Ganpati 2023 gauri pujan tradition and importance in marathi)

Gauri Ganpati 2023
Ganesh Festival Special : गणेशाला 'गजा'चे म्हणजेच हत्तीचे मुख का आहे?

सुगडाच्या गौरी

विशेषतः देशस्थ ब्राह्मण घरात सुगडाच्या गौरी असतात. त्यातली एक गौर श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी च  बसलेली असते.  इतर सर्व घरात आजच दोन्ही गौरी येतात. गौरीचा उल्लेख बोलीभाषेत गौर किंवा गवर असा होतो. (Gouri Ganpati)

Gauri Ganpati 2023
Ganesh Utsav 2023 : गणेशोत्सवामुळे लालबाग परळच्या वातावरण हर्षोल्लास

कराड साताऱ्यात गंगा गौर

कराड सातारा भागात साधारण अशीच पद्धत पण तुळजापूर सोलापूर भागापासून पुढे अगदी पार विदर्भापर्यंत यांना महालक्ष्मी म्हणतात. इथं त्या गणेशाची माता शिवपत्नी नसतात तर विष्णू पत्नी लक्ष्मी आणि तीची जेष्ठ म्हणजे थोरली बहीण अलक्ष्मी मानतात.

इकडे त्यांचे पिढ्यानपिढ्या सांभाळलेले मुखवटे असतात. अलक्ष्मी खरंतर अमंगला पण या दिवसात तिचं पूजन करतात. अशा या दोघी बहिणींसोबत त्यांची बाळं पण बसवली जातात.   जेष्ठा नक्षत्रावरच त्यांच पूजन आणि मुख्य सोहळा म्हणजे सवाष्ण भोजन.

Gauri Ganpati 2023
Ganesh Chaturthi 2023: बाप्पांसमोर राशींनुसार करा या मंत्रांचा जप, अडचणींच्या फेऱ्यातून होईल सुटका

गौरी-शंकरोबा

कोल्हापुरात गौराई पतिदेव महादेवांसोबत येते. पहिल्या दिवशी लेकीच म्हणजे गौराईचे आगमन होते तर दुसऱ्या दिवशी शंकरोबा येतात. शकरोबांना खास वाघाच्या कातड्यासारखे दिसणाऱ्या कपड्यात नटवतात.

Gauri Ganpati 2023
Ganesh Festival : रेवदंड्यात आजही नाचत्‍या गौरींची परंपरा,दीडशे वर्षांपूर्वी सुरुवात; महिलांची लगबग

तेरड्याची गौर

कोकणातही तेरड्याची गौर येते. आज गौरा आली संध्याकाळ होईल तशी तिला नटवायची घाई होते. मग परंपरेने चालत आलेल्या पद्धतीनं नवे साज चढवून गौराई नटून उभी राहते आणि तिला बघून आयाबायांचा जीव सुखावतो. (Ganesh Chaturthi 2023)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.