Ganesh Chaturthi 2024 : गौराई आली सोनपावली! गौराईच्या स्वागताला काढा या खास रांगोळ्या, अंगणाला येईल शोभा

राईचे स्वागत मोठ्या थाटात केले जाते. तिच्यासाठी वेगळे पदार्थ, नव्या साड्या, दागिने घडवले जातात. तिच्यासाठी दारापासून ती जिथे बसवली जाते तिथपर्यंत रांगोळ्या काढल्या जातात.
Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2024esakal
Updated on

Gauri Special Rangoli :

भाद्रपदाची चाहूल लागताच लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार तयारी सुरु होते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होते. ज्येष्ठा गौरी ही साक्षात माता पार्वतीचे स्वरूप आहे, त्यामुळे ज्येष्ठा गौरीच्या या तिन दिवसात स्वतः पार्वती माता माहेरपणाला येते अशी मान्यता आहे.

महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये गणपतीसह ज्येष्ठा गौरीचे सुद्धा आगमन होते. ज्येष्ठा गौरी पूजन महाराष्ट्रात विविध पद्धतीने केले जाते. गौराईचे स्वागत मोठ्या थाटात केले जाते. तिच्यासाठी वेगळे पदार्थ, नव्या साड्या, दागिने घडवले जातात. तिच्यासाठी दारापासून ती जिथे बसवली जाते तिथपर्यंत रांगोळ्या काढल्या जातात.

Ganesh Chaturthi 2024
Gauri Ganpati : येई वर्षानं अवनीतं ती गौरी माई...महालक्ष्मी आवाहन खळीदार हास्याच्या मुखवट्यांना पसंती

गौराईचा घरात प्रवेश होणं हा सोहळा मोठ्या कौतुकाचा असतो. तिच्या प्रत्येक पालवावर हळद-कुंकू लावलं जातं. तिला ‘गौराई कशाच्या पावलांनी आली’ असा सवाल विचारत घरात घेतलं जातं. गौराईसाठी काही खास पावलांच्या रांगोळ्या काढल्या जातात.

गौरी ही साक्षात माता पार्वतीचे स्वरूप आहे, स्वतः पार्वती माता घरी माहेरपणाला येते अशी मान्यता आहे. माहेरवाशीनीसाठी तुम्ही अशी रांगोळी काढू शकता.

Ganesh Chaturthi 2024
Gauri Ganpati : माहेरवाशिणीच्या स्वागतासाठी खरेदीची लगबग! एक ते पाच हजार रुपयांपर्यंत गौराईंचे आकर्षक मुखवटे उपलब्ध

माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईसाठी या तीन दिवसात आवडीचे गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. त्या जास्तीत जास्त देखण्या सुरेख कशा दिसतील यासाठी महिलांची खूप गडबड सुरू असते.

गौराईच्या स्वागताला तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढू शकता. गौरीचे आगमन घरी होत असतं तेव्हा तिच्यासाठी शुभ पावलांची रांगोळी काढली जाते.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.