Gautala Sanctuary: गौताळा अभयारण्यात वर्षा ऋतूत फुलणाऱ्या फुलांनी सजल्या जंगलवाटा

Beautiful Flowers In Monsoon: ‘गंध फुलांचा गेला सांगून, तुझे नि माझे व्हावे मिलन...’ अशा काव्यपंक्ती सध्या गौताळा अभयारण्यात वास्तवात आल्या आहेत.
Flowers
FlowersSakal
Updated on

Beautiful Flowers In Monsoon: ‘गंध फुलांचा गेला सांगून, तुझे नि माझे व्हावे मिलन...’ अशा काव्यपंक्ती सध्या गौताळा अभयारण्यात वास्तवात आल्या आहेत. तालुक्यात गौताळा अभयारण्यात सध्या अत्यल्प पावसातही वर्षा फुलांची मैफल सजली आहे. २६० चौ.कि.मी. क्षेत्रफळावर विस्तारलेल्या गौताळा अभयारण्यात असंख्य वन्यजीव आहेत. तद्वतच दुर्मिळ वनसंपदा आणि रानफुलांनी हे अभयारण्य समृद्ध आहे. वर्षा ऋतूत फुलांनी जंगलवाटा सजून गेल्या आहेत.

गौताळा अभयारण्यामध्ये असंख्य वन्यजीव, रानफुले, गवतांच्या प्रजाती आहेत, त्यासंदर्भात वनस्पतीतज्ज्ञ प्रा. अनिल क्षीरसागर यांनी सांगितले की, गौताळा अभयारण्यामध्ये असंख्य दुर्मिळ व औषधी रानफुले आहेत. वर्षा ऋतूत म्हणजे पावसाळ्याच्या आरंभीच या रानझाडांमध्ये, फुलांमध्ये फ्लोरोमेन हार्मोन तयार होतो. त्यातून रंगीबेरंगी फुले येतात. फुलांचे परागीकरण करून वंशवृद्धी साधतात. रंगीबेरंगी व सुंगधी फुलांकडे पक्षी, कीटक, फुलपाखरे आकर्षित होतात. मकरंद खाण्यासाठी ते फुलांवर बसतात. त्यांच्या पायाला, पंखांना, चोचींना पराग कण बिलगून ते अन्यत्र पसरतात. त्यातून दुसऱ्या जागेवर त्या फुलांचे बीजांकुरण साध्य होते.

Flowers
Smiling Depression: तुम्हीही हसून दुःख अन् तणाव लपवता का? जाणून घ्या स्मायलिंग डिप्रेशनचे लक्षण अन् उपाय

पाऊस पडला की, वर्षा ऋतूत या फुलझाडांमध्ये विशिष्ट हार्मोन्समुळे पिग्मेंट तयार होतो. तो पानांतील हरित द्रव्यातून देठात येतो, देठातून कळीत, कळीतून फुलांच्या पाकळ्यात येतो. या विशिष्ट पिग्मेंटमुळे फुलांना पिवळा, लाल, पांढरा असे रंग मिळतात. या पिग्मेंटला वैज्ञानिक भाषेत क्लोरोफिल ए.बी.सी, झॅन्टोफिल, कॅरोंटिन व ॲन्थोसियामिन अशी काही नावे आहेत.

गौताळा अभयारण्यात जगभरातून आलेली फुलझाडे आहेत. त्यांच्या असंख्य प्रजाती आहेत. झाडंझुडपे, वेली, पाणवनस्पती हे सगळे सपुष्प आहेत. काही फुलं केवळ पावसाळ्यातच येतात. उन्हाळ्यात मृत अवस्थेत जाऊन पावसाळ्यात जिवंत होऊन फुलतात.

- मिलिंद गिरधारी, वनस्पती अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.