General Knowledge : नदीत नाणे फेकण्याची परंपरा आहे फार जुनी, या प्रथेमागे आहे आश्चर्यचकीत करणारं कारण

ही नाणी पाण्यात टाकल्याने पाणी शुद्ध होते
General Knowledge :
General Knowledge : esakal
Updated on

Unknown Facts : नदीत नाणे फेकल्याने आपली एखादी इच्छा पूर्ण होते,अशी कथा तुम्ही ऐकली असेल. पण,या मागे असलेलं मूळ कारण तुम्ही शोधलं आहे का? एखाद्या नदीत, तलावात, वाहत्या प्रवाहात नाणे फेकल्याने काय होतं, ही प्रथा कधीपासून पडली याचा कधी विचार केला आहे का?

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आपल्या आयुष्यात कधीतरी हे केले आहे. वर्षानुवर्षे असे मानले जाते की यामुळे आपली इच्छा पूर्ण होते. भारतातील नद्यांमध्ये विशेषतः पवित्र स्थळी नाणी फेकण्याची फार जुनी परंपरा आहे.

काही लोकांचा असा विश्वास आहे की नदीत पैसे टाकल्याने आर्थिक अडचणी दूर होतील. बऱ्याच लोकांनी याला अंधश्रद्धा मानले आहे, परंतु आज आपण त्यावर चर्चा करण्यासाठी आलो नाही.

General Knowledge :
Different Culture : इथले लोक अनेक वर्षांपासून संपूर्ण शरीरावर राम नाम का गोंदवून घेत आहेत?

या परंपरेमागील वैज्ञानिक कारण आपल्याला समजेल, ज्याच्यामुळे ही प्रथा शतकानुशतके सुरू झाली. आजकाल आपण स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमची नाणी पाहतो, परंतु प्राचीन नाणी तांब्याची होती. तांब्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो.

तांब्याच्या भांड्यात पाणी ठेऊन ते शुद्ध केले जात असे प्राचीन आयुर्वेद ग्रंथातून दिसून येते. यूएस एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सीनुसार, पितळ आणि तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्याने त्यातील 99.9% जंतू नष्ट होतात.

General Knowledge :
Reading Culture : बालगोपाळांसाठी वाचनाचा खजिना खुला; रुजावी वाचन संस्कृती

तांब्याच्या या गुणामुळे आपले पूर्वज तांब्याची नाणी नद्यांमध्ये टाकत असत. अशा प्रकारे पाणी शुद्ध करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. आपल्या पूर्वजांची ही परंपरा आपण पाळत आहोत. कालांतराने त्याचा खरा हेतू हळूहळू नष्ट होत गेला आणि आपण नद्यांमध्ये नाणी फेकण्याची कारणे इच्छापूर्तीपर्यंत कमी केली आहेत.

वस्तुस्थिती अशी आहे की आपण आता तांब्याची नाणी वापरत नाही, त्यामुळे ज्या खऱ्या वैज्ञानिक उद्देशासाठी ही प्रथा शतकानुशतके सुरू करण्यात आली होती ती आता पूर्णपणे नष्ट झाली आहे.

त्यामुळे सध्याच्या काळातली नाणी नदीत टाकून पाणी शुद्ध होणार नाही. त्यामुळे श्रद्धा म्हणून तुम्ही करत असाल तर तुम्ही नक्की करू शकता.

General Knowledge :
Gun Culture In America: अमेरिकेत बंदुक संस्कृतीची सामाजिक दहशत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.