कोणत्याही भारतीय स्त्रीच्या स्वयंपाक घरात (Kitchen) जा तुम्हाला इतर भाज्यांसोबतच लाल (red chilies), हिरव्या (green) मिरच्या हमखास दिसून येतील. झणझणीत रस्स्याची भाजी असो वा एखादं साधं वरण या पदार्थांमध्ये चटकपणा आणण्यासाठी मिरचीचा आवर्जुन वापर केला जातो. साधारणपणे कोणत्याही पदार्थात २ मिरच्या घातल्या तरी तो पदार्थ तिखट होतो. परंतु, अनेकदा मिरच्या चिरून म्हणजेच कापून झाल्यावर हाताची किंवा बोटांची प्रचंड आग, जळजळ होते. सतत पाण्याने हात धुतल्यानंतरही हाताची होणारी जळजळ काही केल्या कमी होत नाही. म्हणूनच, मिरचीमुळे जर हाताची जळजळ होत असेल तर काय करावं. कोणत्या उपायांमुळे हा त्रास कमी होईल ते पाहुयात. (get rid of burning sensation after cutting chilly with these 5 remedies)
१. खोबऱ्याचं तेल लावा -
मिरच्या चिरुन झाल्यावर अनेकदा हातांची न थांबणारी जळजळ सुरु होते. आपण अनेकदा गार पाण्याने हात धुतो. मात्र, तरीही हा त्रास कमी होत नाही. अशा वेळी खोबऱ्याचं तेल हातांना थोडावेळ लावून ठेवावं. त्यानंतर १५-२० मिनिटांनी हात धुवावेत.
२. दही किंवा दूध लावा -
हाताची जळजळ होत असेल तर दूध किंवा दही लावा. घरात जे पटकन मिळेल ते शक्यतो हातांना लावा. दुधाच्या तुलनेत दही लावल्यामुळे जळजळ लवकर कमी होते. तसंच दही किंवा दूध दोन्ही घरात नसेल तर लोणीदेखील तुम्ही लावू शकता.
३. मध लावा -
मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यातलाच एक गुण म्हणजे शरीरातील दाह कमी होते. त्यामुळे मिरच्यांमुळे हाताची जळजळ होत असेल तर तुम्ही हातालादेखील मध लावू शकता.
४. कोरफड -
कोरफडीचा मुळात गुणधर्मच थंड आहे. त्यामुळे अनेकदा उन्हाळ्यातदेखील त्वचेशीनिगडीत समस्या असतील तर कोरफड लावली जाते. तसंच हाताची जळजळ होत असल्याच कोरफडीचा रस किंवा जेल ५ मिनिटे हातांना लावून ठेवा व नंतर धुवून टाका.
५. बर्फ -
थोडावेळ बर्फ हातांवर चोळा त्यामुळे नक्कीच आराम मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.