Ginger Side Effects : उन्हाळ्यात रोज आल्याचे सेवन करणे ठरेल घातक, आरोग्याच्या तक्रारींचा पाढाच सुरू होईल

डिटॉक्स वॉटर आणि चहातून रोज आलं घेताय, तर सावध व्हा कारण...
Ginger Side Effects
Ginger Side Effects esakal
Updated on

Ginger Side Effects :  आपल्या शरीराला एखाद्या गोष्टीची सवय असेल तर त्याला काही त्रास होत नाही. मात्र, एखादा पदार्थ अति प्रमाणात खाल्ला तर त्याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. खोकला झाला असेल तर आल्याचे सेवन केले जाते.

लोक डिटॉक्स वॉटर मधून आल्याचे सेवन करतात. आले खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असले, तरी त्याचे साईड इफेक्टही आहेत. आल्याचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होते. चहा चविला होतो, तसेच मसाल्यातही आले-लसणाचा समावेश असतो. पण उन्हाळ्यात आलं खाणं बंद करावं. का ते जाणून घेऊयात. (Side effects of eating too much ginger in summer)

शरीरातील उष्णता वाढते

आल्यामध्ये थर्मोजेनिक गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील उष्णता वाढते. उन्हाळ्यात अधिक प्रमाणात आले खाल्ले तर शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे, उष्माघाताचा त्रास होऊ शकतो.   

Ginger Side Effects
Ginger In Tea : फक्कड चहासाठी नेमकं आलं टाकायचं कधी? पाणी गरम झाल्यावर की, उकळी आल्यावर

डिहायड्रेशन होते

आल्याच्या थर्मोजेनिक गुणधर्मामुळे तुमच्या शरीरातून जास्त घाम येऊ शकतो. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते. उन्हाळ्यात सर्वात जास्त घाम जातो त्यामुळे पुरेसे पाणी पिण्यास डॉक्टर सांगतात. आणि अशात जर तुम्ही आले जास्त खाल्ले तर  त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात

पित्त आणि जळजळ

आल्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. जास्त प्रमाणात आले खाल्ल्याने छातीत जळजळ होऊ शकते. ऍसिड रिफ्लक्स वाढू शकते, ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या देखील वाढू शकतात

Ginger Side Effects
Ginger Halwa : हिवाळ्यात हेल्दी राहायचे असेल तर ट्राय करा आल्याचा हलवा; ही आहे सोपी रेसिपी

चक्कर येणे

आले रक्त पातळ करू शकते आणि रक्तदाब कमी करू शकते. उन्हाळ्यात, जेव्हा लोक आधीच उष्णतेमुळे कमी रक्तदाबाने त्रस्त असतात, तेव्हा त्याचे सेवन केल्याने चक्कर येणे आणि त्वचेची समस्या उद्भवू शकते

काही लोकांना आल्याची ऍलर्जी होऊ शकते. विशेषत: गरम हवामानात यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे आणि जळजळ होऊ शकते.

हे लक्षात ठेवा

उन्हाळ्यात आल्याचे कमी प्रमाणात सेवन करा आणि ते खाल्ल्याने पोटात जळजळ होत असेल तर काळजी घ्या आणि त्याचे सेवन ताबडतोब बंद करा. जर तुम्ही आल्याचे सेवन करत असाल तर हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.