Friendship Day 2024: राशीनुसार लाडक्या मित्राला द्या खास भेटवस्तू, मैत्रीचं नातं राहील घट्ट

Give Gift According To Zodiac Sign: मैत्रीदिनानिमित्त तुमच्या लाडक्या मित्राला राशीनुसार खास गिफ्ट देऊ शकता. ज्यामुळे तुमची मैत्री अधिक घट्ट होईल.
Friendship Day 2024:
Friendship Day 2024:Sakal
Updated on

Give Gift According To Zodiac Sign: जगातील सर्वात गोड आणि हक्काचं नातं म्हणजे मैत्रा. यामध्ये दोन लोक एकमेकांना सुख-दुखात साथ देतात. दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी मैत्री दिवस साजरा केला जातो. यंदा ४ ऑगस्टला हा दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवस एकमेकांना शुभेच्छा देऊन भेटवस्तू देतात. पण तुमच्या मैत्रीच नातं अधिक घट्ट होण्यासाठी राशीनुसार भेटवस्तू देऊ शकता. मग चला जाणून घ्या तुमच्या मित्राची रास कोणती आहे आणि त्यानुसार त्याला भेटवस्तू देऊन हा दिवस खास बनवा.

मेष

तुमच्या मित्राची राश मेष असेल तर मैत्रीदिनानिमित्त दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गॅजेट्स किंवा गेमिंग गेम भेट देऊ शकता.

वृषभ

वृषभ राशीच्या मित्राला एखादे वाद्य भेटवस्तू देऊ शकता. तसेच या राशीच्या मित्रासोबत सहलीचे नियोजन करू शकता.

मिथून

या राशीच्या मित्राला क्रिएटिव्ह भेटवस्तू देऊ शकता. यामुळे त्याचा दिवस देखील खास होईल.

कर्क

कर्क राशीचे लोक भावनिक स्वभावाचा असतात. यामुळे तुमचा मित्र या राशीचा असेल तर त्याला फोटो फ्रेम किंवा अल्बम भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

Friendship Day 2024:
Friendship Day 2024: 'या' भेटवस्तू तुमच्या मित्रांना ठेवतील दिर्घकाळ निरोगी अन् तंदुरूस्त

सिंह

मैत्रीदिनानिमित्त सिंह राशीच्या मित्राला कपडे, घड्याळ किंवा दागिने भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

कन्या

कन्या राशीच्या मित्रांना डायरी, फोटो प्रेम किंवा स्वत:च्या हाताने बनवलेले कार्ड देऊन हा दिवस आनंदी बनवू शकता.

तूळ

यंदा मैत्रीदिनानिमित्त तूळ राशीच्या मित्राला संगीताशी संबंधित भेटवस्तू देऊ शकता. तसेच लंच किंवा डिनरला जाऊ शकता.

वृश्चिक

वृश्चिक रास असलेल्या लोकांना परफ्युम किंवा सुंगधी मेणबत्या भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

GIft Idea
GIft IdeaSakal

धनु

तुमच्या मित्राची रास धनु असेल तर पुस्तक किंवा कलेशी संबंधित भेटवस्तू देऊ शकता. कारण अशा राशीचे लोक स्वभावाने जिज्ञासू असतात.

मकर

मकर राशीच्या मित्राला सॉफ्ट खेळणी, ब्लँकेट यासारख्या वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

कुंभ

कुंभ रास असलेल्या मित्राला प्राचीन वस्तू किंवा दागिने भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

मीन

मीन राशीचे लोक धार्मिक स्वभावाचे असतात. तुमचा मित्र या राशीचा असेल तर देवाची मुर्ती किंवा वास्तुशी संबंधित वस्तू भेट देऊ शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.