Gluten Free Diet: २४ तास मोबाईलमध्ये डोक घालून बसणाऱ्या लोकांना डायट हा शब्द काही नवा नाही. रोज अनेक प्रकारच्या डायटचे व्हिडिओ सर्च आणि शेअर केले जातात. वजन वाढवायचं असो किंवा कमी करायचं लोक डायट करून हे सहज करू शकतात.
केवळ वजन नाहीतर हेल्दी शरीरासाठीही सकस डायट घेतला जातो. ज्यात किटो, लो फॅट डाएट सारखे अनेक डाएट फॉलो करतात. याशिवाय तुम्ही ग्लूटेन फ्री डाएट सोबत कार्ब डाएट, इंटरमिटंट फास्टिंग, प्लांट बेस्ड डाएट बद्दल ऐकले असेल.
ग्लूटेन-फ्री डायट म्हणजे काय?
ग्लूटेन-फ्री डायट म्हणजे आपल्या आहारातून ग्लूटेन असलेले पदार्थ काढून टाकणे. ग्लूटेन म्हणजे काय? खरं तर, ग्लूटेन हे एक प्रकारचे प्रोटीन आहे जो गहू आणि इतर धान्यांमध्ये आढळतो. अनेकांना या प्रोटीनची अॅलर्जी असते. (Gluten Free Diet)
त्यामुळे ते हा डायट फॉलो करतात. तथापि, ज्यांना ग्लूटेनची ऍलर्जी नाही त्यांना देखील ग्लूटेन फ्री आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हा डायट फॉलो करण्याचा निर्णय आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतो.
ग्लूटेनची ऍलर्जी आहे हे कसं ओळखायचं?
ग्लूटेनच्या ऍलर्जीला गव्हाची ऍलर्जी देखील म्हणतात. ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये गहू किंवा ग्लूटेनयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर काही शारीरिक आजार निर्माण होतात. गव्हाची ऍलर्जी असलेल्या व्यक्तीला मोहरी आणि बार्ली सारख्या धान्यांची देखील ऍलर्जी असू शकते.
गव्हाची ऍलर्जी असेल तर हा त्रास होईल
मळमळणे
पुरळ उठणे
घशात खवखवणे
श्वास घेण्यात त्रास होणे
प्रत्येक पदार्थाची स्वतःची खासियत असते. त्यामुळे तुमच्या आहारात विविध खाद्यपदार्थांचा समावेश केल्याने तुमच्या शरीराला सर्व आवश्यक पोषक तत्वे मिळतात. तुम्हीही एखाद्याचं ऐकून ग्लूटेन फ्री डाएट फॉलो करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही जाणून घ्या. (Diet For Weigh Loss)
ग्लूटेन फ्री आहाराचे फायदे
पचनक्रीया सुधारते
ज्यांना ग्लूटेनची ऍलर्जी आहे त्यांच्यासाठी ग्लूटेन फ्री डायट अतिशय फायदेशीर ठरतो. ग्लूटेन फ्री डायटचे पालन केल्याने ऍलर्जी असलेल्या लोकांची पचनक्रिया सुधारण्यास सुरुवात होते. या आहारामुळे हे लोक दिवसभर हलके आणि उत्साही वाटतात. बहुतेक प्रक्रिया केलेल्या आणि बेक केलेल्या पदार्थांमध्ये ग्लूटेन असते.
कोलेस्टेरॉल वाढत नाही
ग्लूटेन-फ्री आहाराचा अर्थ असा आहे की उच्च कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थ देखील आपल्या आहारातून काढून टाकले जातील. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
अशक्तपणा दूर होतो
सेलिआक रोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना अनेकदा अशक्तपणा जाणवतो. अशा लोकांनी ग्लुटेनफ्री डायट फॉलो केल्यास त्यांचा अशक्तपणा लवकर दूर होऊ शकतो. याशिवाय, ते तुम्हाला वेगळीच एनर्जी देते.
पुरेसे पोषण मिळते
सर्व ग्लूटेन फ्री उत्पादने हेल्दी असतात, म्हणजेच ते तुम्हाला पुरेसे पोषण देतात. अंडी आणि मांस शरीराला प्रथिने देतात, तर फळे जीवनसत्त्वे आणि खनिजे देतात. नटांमध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. (Healthy Diet)
ग्लूटेन फ्री डाएटचे तोटे
वजन वाढते
जर तुम्हाला फक्त वजन कमी करण्यासाठी ग्लूटेन फ्री डाएट फॉलो करायचा असेल तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. ग्लूटेन मुक्त आहारामध्ये फायबर नसतात, ज्याची कमतरता आपल्या पचनास त्रास देऊ शकते. वजन कमी होण्याऐवजी ते वाढू शकते.
पोषक घटकांचा आभाव
ग्लूटेन फ्री डायटमध्ये जीवनसत्त्वे आणि पोषक घटक असतात, परंतु तरीही अनेक पोषक तत्वे त्यात नसतात. या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे शरीराला हानी पोहोचते. उदाहरणार्थ, लोह आणि फॉलिक ऍसिडच्या कमतरतेमुळे, शरीरातील हिमोग्लोबिन कमी होऊ लागते.
मधुमेह
अनेक संशोधनांमध्ये असे समोर आले आहे की ग्लूटेन फ्री आहारामुळे टाइप-2 मधुमेहाचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. जेव्हा स्वादुपिंड पुरेसे इंसुलिन तयार करू शकत नाही, तेव्हा ते टाइप 2 मधुमेहास कारणीभूत ठरू शकते. शरीरात ग्लूटेनच्या कमतरतेमुळे असे होऊ शकते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.