ओसंडून वाहणारा ईमेल बॉक्स रिकामी करण्यासाठी सोप्पा उपाय

शोधपट्टीच्या (सर्च बार) उजव्या कोपऱ्यात हा ‘फिल्टर’ पर्याय असतो. त्यावर क्लिक केल्यानंतर फ्रॉम असा शब्द दिसेल. त्याच्या पुढे असा एखादा ईमेल आयडी लिहावा ज्यावरून तुम्हाला सातत्याने शेकडो अनावश्यक ईमेल्स प्राप्त होत असतात.
How to clear Gmail Inbox
How to clear Gmail Inboxgoogle
Updated on

मुंबई : वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांसाठी जीमेलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो; मात्र अनेकदा हजारो ईमेल्स साठून राहिल्याने मेलबॉक्समधील जागा भरते व नवीन ईमेल्स मिळवण्यात अडचणी येतात. अशावेळी अनावश्यक ईमेल्स नाहीसे करून जागा कशी रिकामी करावी हे पाहू या…

How to clear Gmail Inbox
कमी रॅम असलेल्या मोबाईलसाठी 'जीमेल गो' अॅप

जीमेलमधील फिल्टर हा पर्याय वापरून हजारो अनावश्यक ईमेल्स एकदम नाहीसे करता येतात. शोधपट्टीच्या (सर्च बार) उजव्या कोपऱ्यात हा ‘फिल्टर’ (filtre) पर्याय असतो. त्यावर क्लिक केल्यानंतर फ्रॉम असा शब्द दिसेल. त्याच्या पुढे असा एखादा ईमेल आयडी लिहावा ज्यावरून तुम्हाला सातत्याने शेकडो अनावश्यक ईमेल्स प्राप्त होत असतात.

त्यानंतर सर्च बटणावर क्लिक केल्यास संबंधित ईमेल आयडीवरून आलेले सर्व ईमेल्स स्क्रीनवर दिसतील. शोधपट्टीच्या खाली डाव्या बाजूला एक छोटा चौकोन दिसेल. त्यावर क्लिक केल्यास सर्व ईमेल्स निवडले जातील. ते तुम्ही डिलिट बटणाद्वारे नाहीसे करू शकता. भ्रमणध्वनीवरील ईमेल नाहीसे करण्यासाठीही हीच प्रक्रिया करावी.

How to clear Gmail Inbox
जीमेल इनबॉक्‍स बनवा स्मार्ट

थोडेफार ईमेल्स नाहीसे करायचे असल्यास तुम्ही ते एकेक करून डिलीट करू शकता. हजारो ईमेल्स डिलीट करण्यासाठी मात्र फिल्टर पर्याय वापरणेच अधिक सोयीचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.