Gold Jewellery : कंबरेच्या खाली सोन्याचे दागिने का घालत नाहीत? जाणून घ्या कारण

गर्भश्रीमंत लोकही पायात सोन्याचे दागिने घालत नाहीत. पायात सोन्याचे दागिने का घातले जात नाहीत, हे तुम्हाला माहीत आहे का?
Gold Jewellery
Gold Jewelleryesakal
Updated on

Gold Jewellery : पुरुष आणि स्त्रिया दोघेही सोन्याचे दागिने घालतात. मात्र, पायात सोन्याचे दागिने घालणे वर्ज्य मानले जाते. सोन्याचे दागिने फक्त डोक्यापासून कंबरेपर्यंत घालता येतात. गर्भश्रीमंत लोकही पायात सोन्याचे दागिने घालत नाहीत. पायात सोन्याचे दागिने का घातले जात नाहीत, हे तुम्हाला माहीत आहे का?

Gold Jewellery
Gold Silver Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या आजचे नवे दर

सोने, चांदी, हिरे, मोती अशा विविध प्रकारचे दागिने घालण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. विशेषतः स्त्रिया आणि विवाहित महिला सोन्या-चांदीचे-दागिने जास्त घालतात. पण कंबरेच्या वर घातले जातात. यामागचे धार्मिक व शास्त्रिय कारण जाणून घेऊ.

Gold Jewellery
Gold Silver Price: वीकेंडला सोनं स्वस्त! जाणून घ्या आजचे नवे दर

कंबरे खाली सोने न घालण्याची धार्मिक कारणे

पायात पैजण किंवा इतर चांदीचे दागिने घातले जातात. मात्र, कधीही सोन्याच्या धातूचे अलंकार पायात परिधान करू नयेत. याविषयी एक धार्मिक मान्यता आहे की, भगवान श्री हरी विष्णू यांना सोन्याची खूप आवड असल्याने सोने नाभी किंवा कमरेच्या खाली घालू नये.

Gold Jewellery
Gold Silver Price: सोन्याचे दर पुन्हा घसरले; जाणून घ्या आजचे नवे दर

पायात सोनं घातलं तर भगवान विष्णूंचा कोप होतो. भगवान विष्णूंप्रमाणेच माता लक्ष्मीलाही सोने आवडते. पायात सोने धारण करणाऱ्या व्यक्तीला देवी लक्ष्मीच्या कृपेपासून वंचित राहावे लागते आणि त्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते, असे मानले जाते.

Gold Jewellery
Gold Smuggling : देशभरात 'गोल्ड रश' कारवाई, फक्त मुंबईतच कोट्यवधींची गोल्ड बिस्कीटं जप्त

शास्त्रीय कारण

हिंदू धर्माशी संबंधित अशा अनेक श्रद्धा आणि परंपरा आहेत, ज्यांना शास्त्रीय कारणही आहे. यापैकी एक म्हणजे पायात सोनं घालू नये. पायात सोने न घालणे देखील वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य मानले जाते. शरीराच्या वरच्या भागाला उबदारपणा आणि खालच्या भागाला फक्त थंडपणाची गरज असते.

Gold Jewellery
Gold Silver Price: नवरात्रीच्या तोंडावर सोनं घसरले! जाणून घ्या आजचे नवे दर

सोन्याच्या दागिन्यांमुळे शरीरातील उष्णता वाढते. अशा स्थितीत पायात सोन्याचे दागिने घातल्यास ते तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकते, त्यामुळे पायात चांदीचे दागिने घालावेत, जेणेकरून शरीराचे तापमान संतुलित राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.