अनेक वेळा सोन्याचे लहान मोठे दागिने खरेदी करताना आपण काही गोष्टी निट बघत नाही आणि त्यामुळे मग कधी कधी आपले मोठे नुकसान होते.एकदा का नुकसान झाले की मग त्यांची भरपाई होत नाही.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा सहा गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही सोनं खरेदीला गेल्यावर विशेष करुन लक्षात ठेवाव्या.
भारतीयांना खास करुन महिलांना सोन्याचं प्रचंड आकर्षण असतं त्यामुळे भारतात लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात बाजारात सोन्याची मागणी झपाट्याने वाढते. भारतातील लोकांना सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणे आवडते कारण हिंदू धर्मात सणांच्या वेळी मौल्यवान धातू खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र अनेक वेळा सोने खरेदी करताना आपण काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेत नाही आणि त्यामुळे आपले मोठे नुकसान होते.
1) सोनं खरेदीला गेल्यानंतर सर्वप्रथम सोन्याची शुद्धता तपासणे महत्त्वाचे आहे आणि शुद्धता तपासण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याचे हॉलमार्किंग तपासणे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स किंवा BIS ही एक मान्यताप्राप्त एजन्सी आहे जी सोन्याच्या दागिन्यांना प्रमाणित करते आणि हॉलमार्क करते. हॉलमार्क केलेल्या दागिन्यांवर बीआयएस स्टॅम्पशी एक नंबर जोडलेला असेल.
2) ज्वेलर्सचे दुकान सोन्याच्या शुद्धतेवर आधारित सोन्याची किंमत ठरवत असतो.दररोजच्या बाजारभावानुसार सोन्याचे दर रोज बदलतात.त्यामुळे तुम्ही सोनं खरेदीला गेल्यानंतर आधी सोन्याचा दर चेक करा आणि नंतर मग पैसे दया.
3) जसे की सोन्यातही 24K, 22K असे वेगवेगळे प्रकार असतात.24K सोन्याची किंमत 22K सोन्याच्या किमतीपेक्षा वेगळी असते. 24K सोने 22K सोन्यापेक्षा महाग आहे. तुम्ही 22K सोन्याचे दागिने खरेदी केल्यास, तुम्हाला त्यानुसार पैसे द्यावे लागतील. प्रसिद्ध ज्वेलर्स स्टोअर्स योग्य दर ग्राहकांना सांगतात. परंतु स्थानिक ज्वेलर्स हे तपशील वगळू शकतात. म्हणूनच तुम्ही ज्वेलर्सच्या दुकानात जाण्यापूर्वी सोन्याची किंमत तपासली पाहिजे.
4) आता अनेक ठिकाणी सोन्याच्या दागिन्यांची दुकाने आहेत. तुम्ही जर का लहान दागिन्यांच्या दुकानातून सोने खरेदी करत असाल तर विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण ते तुम्हाला अशुद्ध सोने विकण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे सोनं खरेदीसाठी प्रसिद्ध ज्वेलर्सकडे जाणे केव्हाही योग्यच असतं, कारण तेथे अशुद्ध सोने विकण्याची करण्याची शक्यता खूप कमी होते.
5) ज्वेलरी शॉप आपल्या ग्राहकांकडून ज्वेलरी पीसचे मेकिंग चार्ज घेते. मेकिंग चार्जेस हे लेबर चार्जेस असतात आणि दागिन्यांची दुकाने हे शुल्क ग्राहकांकडून घेतात. मेकिंग चार्ज 5% ते 30% पर्यंत असू शकतो. मशीनद्वारे बनवलेल्या दागिन्यांमध्ये जास्त श्रम लागत नाहीत आणि त्यावर मेकिंग चार्ज कमी आकारा जातो. मेकिंग चार्जेसवर तुम्ही नेहमी बार्गेनिंग केली पाहिजे.
6) सोन्याचे दागिने घेतल्यावर सोन्याचे वजन तपासणे फार महत्वाचे आहे. तुम्ही घेतलेली सोन्याचे दागिने खरेदी करता तेव्हा त्यासोबत दोरा, मनी यासारखे इतर वस्तू जोडलेल्या असतात. अशावेळी दागिने अधिक वजनदार बनतात. तेव्हा तुम्ही सोन्याच्या वजनापेक्षा जास्त पैसे दुकानदाराला देऊ शकता.सोबतच सोनं खरेदी केल्यानंतर न विसरता त्यांची पावती घ्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.