2021 वर्ष संपायला आता काही दिवसच शिल्लक उरले आहेत.
Goodbye 2021 : 2021 वर्ष संपायला आता काही दिवसच शिल्लक उरले आहेत. संपूर्ण जग नवीन वर्षाचं स्वागत करत असतं. मात्र, कोरोना महामारीची दुसरी लाट आणि शेतकरी आंदोलनासारख्या (Farmers Protest) घटनांमुळं हे वर्ष चांगलंच लक्षात राहील. याशिवाय, या वर्षात काही मोठ्या राजकीय घडामोडीही पाहायला मिळाल्या. चला तर मग, या वर्षी लक्षात ठेवण्यासारख्या 9 मोठ्या घटनांबद्दल जाणून घेऊयात..
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक : या वर्षात सर्वात मोठी राजकीय घडामोड पश्चिम बंगालमध्ये घडली. तिथं भारतीय जनता पक्षाचा मोठा पराभव झाला. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Election) तृणमूल काँग्रेसनं सलग तिसऱ्यांदा बाजी मारली. मात्र, निवडणूक निकालानंतर आणि ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सत्तेत परतल्यानंतर, राज्यात हिंसाचार उसळला. यामागं सत्ताधारी पक्षाचा हात असल्याचं विरोधकांचं मत होतं, तर पक्षाची प्रतिमा खराब करण्याचा हा विरोधकांचा डाव असल्याचं टीएमसीनं म्हटलं होतं.
प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचं आंदोलन : जवळपास वर्षभरापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) आपल्या मागण्यांसाठी ट्रॅक्टर रॅली काढली. मात्र, या मोर्चादरम्यानच हिंसाचार उसळला. ट्रॅक्टरवरून निघालेले आंदोलक शेतकरी इतके हिंसक झाले, की त्यांनी पोलिसांचे बॅरिकेटस् तोडून लाल किल्ल्याच्या तटबंदीवर जाऊन तिथं धार्मिक ध्वज फडकावला.
कोविडची दुसरी लाट : कोरोनाच्या दुसऱ्या (Coronavirus) लाटेचा टप्पा खूप कठीण होता. खरं तर या वर्षीच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या डेल्टा स्ट्रेननं सर्वांना घाबरवलं. या लाटेत अनेकांना संसर्ग होऊन श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लोकांना ऑक्सिजन सिलेंडर आणि रेमडेसिव्हिरसाठी बरीच भटकंती करावी लागली. मात्र, केंद्राच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं एकही जीव गेलेला नाही, असं त्यांचं म्हणणं होतं.
लखीमपूर खेरी प्रकरण : जेव्हा शेतकरी आंदोलनाची (Lakhimpur Kheri case) आठवण येईल, तेव्हा लखीमपूर खेरीची घटना आठवून तुमचे डोळे पाणावतील. 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर थारची गाडी चढवण्यात आली होती. या घटनेत चार शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला आरोपी करण्यात आलीय.
कोरोना लस पुरवण्यात भारताचा 'विक्रम' : या वर्षी 21 ऑक्टोबरला भारतीय इतिहासात एका ऐतिहासिक दिवसाची नोंद झालीय. खरं तर 21 ऑक्टोबर रोजी भारतात 100 कोटी कोरोना लसीचा पुरवठा करुन हा टप्पा ओलांडला होता.
CDS बिपीन रावत यांचं निधन : हे वर्ष लक्षात ठेवताना देशाच्या सुपुत्राची नक्कीच आठवण येईल. खरं तर 8 डिसेंबर रोजी वर्षाच्या शेवटी भारताचे पहिले CDS बिपीन रावत (Bipin Rawat) यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. या घटनेत भारताचे पहिले सीडीएस, त्यांच्या पत्नीसह 14 जवान शहीद झाले.
भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक : यंदाच्या टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारतानं एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदके जिंकली. या स्पर्धेत नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) इतिहास रचला आणि भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून संपूर्ण देशाचा गौरव केला. याशिवाय, भारतीय पुरुष हॉकी संघानं 41 वर्षांनंतर हॉकीत पदक जिंकलंय.
शेतकऱ्यांची घरवापसी : हे वर्ष खास आहे, कारण या वर्षाच्या अखेरीस 378 दिवसांपासून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन संपुष्टात आलं. 11 डिसेंबर रोजी केंद्रानं तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानं शेतकरी घरी परतण्यास सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी हा दिवस 'विजय दिवस' म्हणून साजरा केला.
हरनाज सिंधू (Harnaaz Sandhu) बनली मिस युनिव्हर्स : या वर्षी डिसेंबर महिन्यात भारताला तब्बल दोन दशकांनंतर म्हणजेच, 21 वर्षांनी मिस युनिव्हर्सचा किताब देण्यात आला. खरं तर, यावर्षी 21 वर्षीय हरनाजनं हा मुकुट आपल्या नावावर केला. याआधी 2000 मध्ये लारा दत्ता मिस युनिव्हर्स बनली होती आणि त्याआधी सुष्मिता सेननं हा किताब जिंकला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.