गॉसिप करताय? मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो जाणून घ्या

गॉसिप ही संभाषणाची लोकप्रिय पद्धत आहे
गॉसिप
गॉसिपगॉसिप
Updated on

गॉसिप (Gossip) हे केवळ मनोरंजनासाठी (Entertainment) केले जात नाही तर ते खरोखरच तुमचा ताण कमी करू शकते. हे आम्ही म्हणत नसून अनेक प्रयोगांतून समोर आले आहे. स्टँडफोर्ड येथील प्रयोगात काही लोकांनी भाग घेतला. यामध्ये त्यांना कोणीतरी गैरवर्तन करताना दिसले. यानंतर सहभागींनी त्या व्यक्तीच्या चुकीच्या वागणुकीबद्दल इतरांना सांगितले तेव्हा त्यांना ते आवडले. हा ताण कमी होण्याचे कारण म्हणजे गप्पांचा संबंध ऑक्सिटोसिनशी असल्याचे समोर आले. जेव्हा आपण इतरांसमोर राग काढतो तेव्हा ऑक्सिटोसिन सोडले जाते. हा हार्मोन तणाव आणि रक्तदाब कमी करतो (Lowers blood pressure). आता जाणून घ्या तज्ज्ञांचे यावर काय म्हणणे आहे.

गॉसिप (Gossip) ही संभाषणाची लोकप्रिय पद्धत आहे. लोक इतरांच्या रहस्यांबद्दल बोलतात आणि त्यांचे अनुभव देखील शेअर करतात. तसेच गॉसिपचा उद्देश टाईमपास करणेही आहे. गप्पांमुळे तुमचा मानसिक ताण कमी होतो. परंतु, ते परिस्थितीवरही अवलंबून असते. याचे कारण प्रत्येक गॉसिप चांगली गॉसिप नसते. प्रथम गप्पांच्या सकारात्मक बाजू जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

गॉसिप
हात शेकणं आलं तिघांच्या अंगलट; दोघांचा होरपळून मृत्यू तर एक गंभीर

गॉसिप करताना लोक वेगवेगळ्या विषयांवर मते व्यक्त (Mental health) करतात. यामुळे ज्ञान वाढू शकते आणि आपण स्वतःलाही सुधारू शकतो. गॉसिप कोणाच्याही नुकसानासाठी होत नसेल, तर अशावेळी वैयक्तिक पातळीवर दोन माणसे संवाद साधतात. जेव्हा कथांमध्ये साम्य आढळते तेव्हा एकमेकांशी असलेले बंध अधिक घट्ट होतात. लोकांचे अनुभव जाणून घेतल्यास हे कळते की समस्या केवळ आपल्या आयुष्यातच नसतात. हे करत असताना तुम्हाला असे वाटते की कोणीतरी तुमचे ऐकत आहे. ही भावना आराम देते.

संबंध खराब होऊ देऊ नका

गॉसिप (Gossip) हा देखील स्वतःला व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. तुम्ही खूप दिवसांपासून मनात एखादी गोष्ट ठेवत असाल तर राग काढल्याने आराम मिळतो. त्याचवेळी हे देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे की तुमच्या गप्पांनी तणाव देखील वाढू शकतो. तुमच्या गप्पांमुळे दोन लोकांमध्ये भांडण होईल, असे होऊ नये. तुमच्या बोलण्याने कुणाचे मन दुखावले नाही पाहिजे. म्हणूनच आपण काय बोलतोय आणि कोणाला सांगतोय याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.