आजीचा बटवा: गणपतीच्या पूजेत लागणाऱ्या 21 पत्री वाहण्यामागचे शास्र

गणपतीच्या पूजेत लागणाऱ्या 21 पत्रींचा आरोग्यदायी उपयोग, छोटेमोठे आजार घरच्याघरी बरे करण्याचे सामर्थ्य असत म्हणुन गणपतीला 21 वनस्पती वाहायल्या जातात.
Grandma's Batwa
Grandma's BatwaEsakal
Updated on

Ganeshotsav 21 types of leaves: गणपतीला 21 प्रकारची पाने वाहाताना या पानांच आपल्या आरोग्यासाठी असलेलं महत्व लक्षात यावं यासाठी हे गणपतीत पानांचपूजन महत्त्वाचं असतं. आपल्या होणारे लहान सहान आजार बरे करण्याचे सामर्थ्य या 21 वनस्पतीच्या पानामध्ये असते. या वनस्पतीचे आरोग्यदायी गुणधर्म ओळखून शक्य तितक्या वनस्पती आपण आपल्या दारात किंवा परसबागेत लावायला हव्यात असे सांगितले जाते.

पत्री पुजनाच महत्व काय आहे?

गणपतीच्या पूजेत लागणाऱ्या 21 पत्रींचा आरोग्यदायी उपयोग, छोटेमोठे आजार घरच्याघरी बरे करण्याचे सामर्थ्य असत म्हणुन गणपतीला 21 वनस्पती वाहायल्या जातात. या पत्रीपूजनाच्या निमित्तानं कितीतरी वनस्पती आपण पहिल्यांदा पाहातो. ज्या पत्री गणपतीला प्रिय असतात त्या आपल्या आरोग्यासाठीही महत्त्वाच्या असतात. या पत्रींचं आपल्या आरोग्यासाठी असलेलं महत्व लक्षात यावं यासाठी खरंतर हे पत्रीपूजन. या पत्री गणपतीला वाहताना या वनस्पतींना ओळ्खणं, त्यांचे गुण जाणून घेणं आणि आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या वनस्पती जास्तीत जास्त प्रकारे आपल्या परसबागेत, अंगणात, गॅलरीतील कुंड्यात कशा लावता येतील याचा विचार होणं, तशी कृती होणं अपेक्षित आहे. या वनस्पती जर का आपल्या कुंडीत किंवा परसबागेत लावलेल्या असल्या की छोट्य छोट्या आरोग्यविषयक तक्रारी घरच्याघरी दूर होतात.

Grandma's Batwa
आजीचा बटवा: केसांना घनदाट बनविण्यासाठी घरच्या घरी तयार करा राईचे तेल

मंगळागौर, हरतालिका, गणपती आदी पूजेच्या वेळी त्यांना पत्री म्हणजे झाडांची पाने वाहण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. गणेश पूजनादरम्यानसुद्धा अशाच प्रकारे 21 प्रकारच्या पत्री वाहतात. या प्रथेमागे पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे मानवाच्या सभोवताली असणाऱ्या निसर्गामधील अनमोल औषधी-खजिन्याचे ज्ञान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा शास्त्रीय हेतू डोळ्यांसमोर ठेवूनच गणेशचतुर्थीसारख्या सर्वप्रिय सणावेळी पत्री वाहण्याची प्रथा पूर्वजांनी सुरू केली आहे. हजारो वर्षांच्या निरीक्षण व संशोधनानंतर मिळालेले औषधी-ज्ञान वेगवेगळ्या आजारांचा सामना करण्यासाठी पुढील पिढ्यांनाही विनासायास मिळावे हा महत्त्वाचा हेतू या पत्री वाहाण्यामागे आहे, हे उघड आहे.

प्रत्येक वनस्पतीत असलेल्या गुणधर्मांची आणि त्यांच्या आरोग्यविषय फायद्यांची माहिती आज आपण या लेखात सविस्तर पाहणार आहोत.

Grandma's Batwa
आजीचा बटवा: बडीशेपचा जोडीदार असलेल्या ओव्याचे आरोग्यदायी फायदे

● दुर्वा

पांढऱ्या दुर्वा अर्थात हरळ गणपतीला प्रिय. नाकातून रक्त येणं, ताप , अंगातील दाह कमी करण्यासाठी दुर्वांचा रस अमृतासमान असतो.

● तुळस

ही वनस्पती 24 तास ऑक्सिजन देणारी आहे. डासांना ती पळवून लावते. कफ, दमा, सर्दी, किटक दंश तसेच कर्करोग यासारख्या आजारांवर तुळशीचा रस उपयोगी ठरतो.

● धोतरा

या वनस्पतीपासून अफ्रोपिन नावाचं औषध काढतात. वेदनानाशक म्हणून त्याचा उपयोग होतो. धोतऱ्याचे फूल दमा, कफ, संधिवत आदी रोगांवर उपयुक्त ठरतं.

● बेलपत्रं

या वनस्पतीचा उपयोग पोटातील जंतावर गुणकारी आहे. अतिसार, आव, धडधड, उष्णता आदींसाठी हिचा उपयोग होतो.

● पिंपळ

हवा शुध्दीकरणासाठी पिंपळाच्या झाडाला आपल्या आयुर्वेदात खूप महत्व दिलेले आहे. पिंपळाच्या सालीची लाख अर्थात राख खडीसाखरेबरोबर खाल्ल्यास चांगली झोप लागते. तसचे तुम्हाला जर का काही झोपेचे विकार असतील तर ते दूर होतात.

● जाई

आमची आजी तोंडातल आल्यावर जाईची पानं चाऊन खायला लावते आणि नंतर तोंडात निर्माण झालेली लाळ थुंकून टाकायला लावते हा उपाय केला की तोंडात लगेच बरं होतं.

● अर्जुन

मोडलेली हाडे जोडणारी वनस्पती म्हणून आदिवासी भागात ही वनस्पती ओळखली जाते. हदयरोगावर ही वनस्पती उपयोगी ठरते. या वनस्पतीत कॅल्शियमचं प्रमाण खूप असतं.

● रुई

हत्तीरोग झाल्यावर त्यावर उपचार म्हणून रुईचं पान उत्तम औषध आहे. तसेच कृष्ठरोगावर देखील त्याचं औषध प्रभावी ठरतं.

Grandma's Batwa
आजीचा बटवा: पोटाचा घेर कमी करायचा आहे मग आजीच्या बटव्यातला जिऱ्याचा करा उपयोग

● मारवा

ही वनस्पती सुवासिक असून विविध प्रकारच्या जखमा भरणं किंवा कोणत्याही कारणामुळे त्वचेवर आलेले डाग घालवण्यासाठी उपयुक्त असते.

● कण्हेरीची पानं

कण्हेरीची पानं, मुळं औषधी आहेत. वात विकारावरील महाविषारी तेलात कण्हेरीची पानाचा वापर केला जातो.

● देवदार

छातीत प्रचंड कफ झाला असेल किंवा तुम्हाला खुप सर्दी झाली असेल तर देवदारच्या पानांचा काढा दिला जातो तसेच, संधिवात यासाठी देवदार पानांचा रस फायदेशीर ठरतो.

● डोरली

डोरली या झुडूपाला काही भागात काटे रिंगणी म्हणून देखील ओळखतात. त्वचा रोग, पोटाचे विकार, मूत्ररोगांवर या झुडूप फायदेशीर ठरतं.

● मधुमालती

फुप्फुसाचे विकार, त्वचारोग, सांधेदुखी, पोटातील कृमी कमी करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो.

● बोर

बोराच्या बियांचं चूर्ण चेहेऱ्यावर लावल्यास पुटकुळ्या जातात. डोळे जळजळणे, तापामधील दाह यासाठी बोर उपयुक्त आहे.

● हादगा

हादगा याला काही भागात अगस्ती म्हणून ओळखतात हादग्यांच्या फुलांची भजी छान लागतात. ही फुलं म्हणजे जीवनसत्त्वांचा खजिना आहे.

● केवडा

केवडा ही वनस्पती काही भागात केना या नावाने ओळखली जाते. केवडा हे थायरॉइडच्या दोषावर गुणकारी औषध आहे.

● डाळिंबं

लहान मुलांना जर का जंत झाले तर डाळिंबाच्या पानांचा रस त्यावर गुणकारी उपाय आहे. काविळीवरील उपचारासाठीही त्याचा उपयोग केला जातो.

● आघाडा

आजही ग्रामीण भागात ॠषीपंचमीच्या दिवशी महिला दात घासण्यासाठी आघाडा या वनस्पतीचा वापर करतात. आघाडा ही वनस्पती मुखरोग आणि दंतरोगावर उत्तम औषध आहे.

● विष्णुकांता

विष्णुकांता यालाच शंखपुष्पी म्हणतात. बुध्दीवर्धक म्हणून ही वनस्पती ओळखली जाते. ब्रेनटॉनिक म्हणून अत्यंत उपयोगी आहे. या वनस्पतीचा उपयोग मानसिक विकारांवर औषध म्हणून केला जातो.

● शमी

प्राचीन ग्रंथात शमीला सुप्त अग्नी देवता असं म्हणतात. त्वचारोग, दमा, मूत्रपिंड या आजारांवर शमी प्रभावी आहे.

● माका

पावसाळ्यात आढळणारी डोंगरी वनस्पती. माका हे रसायन आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग न होऊ देण्याची ताकद या वनस्पतीत आहे. मूत्रपिंडाचा आजार, कावीळ, त्वचारोग, विंचू दंश आदी रोगांवर माक्याचे औषध प्रभावी ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.